मिशन १०० दिवस : मराठवाड्यात सार्वजनिक बांधकाम उपविभाग तुळजापूर यांना द्वितीय पारीतोषक
तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी
तुळजापूर येथील सार्वजनिक बांधकाम उपविभागीय कार्यालय येथे राज्याच्या मा. मुख्यमंत्री यांच्या संकल्पनेतून १०० दिवसाचा कृती आराखडा कार्यक्रमांतर्गत नागरिकांना सुकर सोयीसुविधा देण्याच्या दृष्टीने येथे अधीक्षक अभियंता श्री.बी.एम. थोरात व कार्यकारी अभियंता श्री. एस. के. चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली उपभियांता श्री.व्ही.वाय. आवाळे यांच्या नेतृत्वात कृती आराखडा राबविण्यात आला. या कृती आराखड्यात मराठवाड्यात सार्वजनिक बांधकाम उपविभाग तुळजापूर या कार्यालयाने द्वितीय क्रमांक पटकिवला.
तुळजापूर सार्वजनिक बांधकाम उपविभागीय कार्यालयातून नागरिकांना विविध सुकर सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. येथे येणाऱ्या नागरिकांना तक्रार नोंदविण्यासाठी तक्रार पेटी व सूचना पेटीची सुविधा देण्यात आलेली आहे. तसेच नाविन्यपूर्ण योजनेंतर्गत सांडपाणी प्रक्रिया यंत्र तयार करून भविष्यातील पाणीटंचाई वर मात करणेकरिता योजना तयार केली. तसेच कार्यालयात येणाऱ्या नागरिकांचे काम ४८ तासात पूर्ण करून देण्यात आले. तालुक्यातील रस्ते व इमारतीचे कामाची गुणवत्ता व दर्जा राखणेकरिता गुणनियंत्रण प्रशिक्षण आयोजित करून अभियंत्यांना मार्गदर्शन केले. तालुक्यात प्रमुख रस्त्यावर झाडे लावण्याकरिता रस्त्याच्या कडेने खड्डे तयार केले. तसेच तालुक्यातील नेहमी अपघात होत असलेल्या घाट व रस्त्यांची सुधारणा केली.
तुळजापूर उपविभागातील उपअभियांता श्री.व्ही.वाय. आवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली येथील शाखा अभियंता श्री.एस.एस. पाटूळे, श्री. ओ.के. कुलकर्णी, श्री.एस.व्ही. शिवगुंडे, श्री.ए.एल.डूम, श्री.जी.ए. माळी व श्री. आर.एल. माळाळे यांनी परिश्रम घेतले. या बाबत तुळजापूर येथील शहरवासियांनी व परिसरातील नागरिकांनी सर्वांचे अभिनंदन केले.