जनता बॅंकेच्या आर्थिक कर्ज गैरकारभाराबात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
दि.२६ मे रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण !
तुळजापूर : प्रतिनिधी
उस्मानाबाद जनता सहकारी बँक लि. उस्मानाबाद (धाराशिव) बँकेने आय.सी.आय.सी.आय. लोम्बार्ड जनरल इंशुरन्स कंपनी लि.मुंबईशी संगणमत करुन अनावश्यक इंशुरन्स पॉलीसी उतरवून कर्ज रक्कमेत रक्कम समाविष्ट करुन त्यावरती अनावश्यक खाजगी सावकारापेक्षा जास्तीचा चक्रीव्याजदर लावून रक्कमेचा मोठा अपहार तसेच इतर सर्व खर्च कर्जाच्या अमाऊंटमध्ये समाविष्ट करुन त्यावरती अनावश्यक व्याजदर लावून मोठया रक्कमेचा अपहार करुन गुन्हे केलेले असून त्यांच्यावर गुन्हे नोंदविणेबाबत लाक्षणिक तसेच आमरण उपोषण करत असलेबाबत. दि.६ मे रोजी जिल्हाधिकारी,जिल्हाधिकारी कार्यालय धाराशिव यांना सोमनाथ काशिनाथ बनसोडे, ( पत्रकार ) यांनी निवेदनाद्वारे मागणी केली आहे.
निवेदनात असे नमूद केले आहे की,मौजे अणदूर ता. तुळजापूर येथे मे.समर्थ फुटवेअर ॲड ट्रेडर्स या नावाने दुकान होते.व्यवसाय वाढीकरिता उस्मानाबाद जनता सह.बँक.लि.उस्मानाबाद यांचेकडून लोन दि. ३०/०५/२०१५ रोजी मंजूर करुन घेतलेले होते,सदरील लोनची रक्कम रु.१४,००,०००/- होती व त्याचा व्याजदर हा १४ टक्के होता,लोनची मुदत ही दिनांक २९/०३/२०२० पर्यंत होती.
कर्जदाराचा व्यवसाय व बँकेकडून घेतलेल्या लोनचा व्यवहार हा कोविड-१९ चा पार्दुभाव भारत देशात सुरु होईपर्यंत व्यवस्थित होता. परंतु कोविड-१९ च्या लॉकडाऊनमुळे व्यवसाय हा ठप्प झालेला होता. त्यामुळे समर्थ फुटवेअर व ट्रेडर्स हे दुकान नाविलाजाने बंद करावे लागले उत्पन्नाचे दुसरे कसलेही साधन नसल्याने सदर बँकेकडून घेतलेले लोनचे हप्ते व व्याज वेळेवर भरु शकलो नाही.
बँकेस दुकान बंद केल्याचे माहिती असताना सुध्दा दुकानावरती बँकेचे लोन अकाऊंट स्टेटमेंटनुसार दि.०५/०६/२०१५ पासून दिनांक १८/०६/२०२४ पर्यंत जवळपास रु.१,३४,१०६/- रुपये च्या एकुण २७ इंशुरन्स पॉलीसी हया आय.सी.आय.सी.आय. लोम्बार्ड जनरल इंशुरन्स कं.लि. आय.सी. आय. सी.आय. लोम्बार्ड हाऊस ४१४, वीर सावरकर मार्ग, सिध्दी विनायक मंदिराजवळ, प्रभादेवी, मुंबई या कंपनीमार्फत मला बँकेने व इंशुरन्स कंपनी यांनी कसलीही पूर्व कल्पना तसेच माहिती न देता तसेच सदरचे समर्थ फुटवेअर व ट्रेडर्स हे दुकान चालू स्थितीत आहे किंवा नाही याची चौकशी अथवा तपासणी तसेच प्रत्यक्ष पाहणी न करता परस्पर रु.१,३४,१०६/- रुपये च्या एकुण २७ इंशुरन्स पॉलीसी सदर बँकेने इंशुरन्स कंपनीशी संगणमत करुन काढलेल्या आहेत व इंशुरन्सची रक्कम ही बँकेने लोनच्या अमाऊंटमध्ये समाविष्ट
करुन त्यावरती व्याज आकारणी केलेली आहे. तसेच बँकेकडे लॉकडाऊन कालावधी संपल्यानंतर बँकेने लोन वसुलीकरिता तगादा लावल्याने व लोनची रक्कम ही घेतलेल्या रक्कमेपेक्षा दुप्पट दाखवत असल्याने सदर अकाऊंटचे स्टेटमेंट ची मागणी केल्यानंतर बँकेने अकाऊंट स्टेटमेंटची झेरॉक्सप्रत दिलेली आहे.
अकाऊंट स्टेटमेंटचे अवलोकन केले असता सदर बँक व इंशुरन्स कंपनीकडे सदर २७ इंन्शुरन्स पॉलीसीच्या इंन्शुरन्स कव्हर नोट ची मागणी केली असता बँकेने उडवाउडवीची उत्तरे देवून सदर पॉलीसी देण्यास टाळाटाळ केली व इंशुरन्स कंपनी यांनीसुध्दा पॉलीसीची इंशुरन्स कव्हर नोट देण्यास सुरुवातीस टाळाटाळ केली परंतु नंतर इंशुरन्स कंपनीला वेळोवेळी विनंती केल्यानंतर २७ पॉलीसीपैकी फक्त १६ पॉलीसींची कव्हर नोट दिलेल्या आहेत.इंशुरन्स कपंनीने दिलेल्या इंशुरन्स कव्हर नोटचे अवलोकन केले असता दि.०१/०६/२०१६ रोजी रु.५०७१ ची एकुण रु.२७,३३,९४२/- चे कव्हर असलेली पॉलीसी ही दिनांक ०५/०६/२०१७पर्यंत अस्तित्वात असताना दिनांक ०७/०९/२०१६ रोजी दुसरी इन्शुरन्स पॉलीसी ही बँकेने इंशुरन्स कंपनीशी संगणमत करुन आवश्यकता नसताना दिनांक ०७/०९/२०१६ रोजी रु.९२०८/- ची दुसरी इन्शुनरन्स पॉलीसी काढलेली दिसून येते आहे परंतु दि.०७/०९/२०१६ च्या पॉलीसीची कव्हर नोट ही बँकेने व इंशुरन्स कपंनीने अद्यापपर्यंत कर्जदारास दिलेले नाही.
वर नमुद केल्याप्रमाणे बँकेने व इंशुरन्स कंपनीने आपआपसात संगणमत करुन सन २०१७ मध्ये आवश्यकता नसताना २ इशुरन्स पॉलीसी तसेच सन २०१८ मध्ये ३ इंशुरन्स पॉलीसी, सन २०१९ मध्ये ५ इंशुरन्स पॉलीसी, सन २०२० मध्ये ३ इंशुरन्स पॉलीसी, सन २०२१ मध्ये ३ इंशुरन्स पॉलीसी, सन २०२२ मध्ये ३ इंशुरन्स पॉलीसी सन २०२३ मध्ये ३ इंशुरन्स पॉलीसी व सन २०२४ मध्ये २ इंशुरन्स पॉलीसी अशा एकूण २७ इंशुरन्स पॉलीसी एकमेकांचा फायदा होण्याकरिता संगणमताने काढलेल्या आहेत. तसेच पॉलीसीमध्ये इंशुरन्स कंपनीने दिनांक १२/०६/२०१७ रोजी काढलेली पॉलीसी ज्याचा पॉलीसी क्र.४०१७/११७६/५२३८८/०१/००० असा असून सदरचा इंशुरन्स प्रिमीयम हा रु.५०९६/- असा नमुद असून बँकेने दिलेले लोन स्टेटमेंटचे अवलोकन केले असता सदरच्या प्रिमीयमची रक्कम ही रु.५१९६/- अशी दर्शवून सदरची रक्कम ही लोनमध्ये बेकायदेशिरित्या रु.१००/- जास्तीची समाविष्ट केलेली आहे.
बँकेने वर नमुद इंशुरन्स पॉलीसींच्या प्रिमीयमची संपुर्ण रक्कम तसेच नोटीस चार्जची रक्कम, व्याजाची रक्कम, दंडाची रक्कम, एस.एम.एस. चार्जची रक्कम, लिगल चार्जेसची रक्कम, नोटरी फिसची रक्कम, अर्बीट्रेशन चार्जेसची रक्कम, कोर्ट प्रोफेशनल फिसची रक्कम, ॲडव्होकेची फिसची रक्कम, कोर्ट फिसची रक्कम, अर्बीट्रेशन अर्वार्ड झेरॉक्सची रक्कम व डिमांड नोटीस चार्जची रक्कम, लोन रिनिव्हल चार्जची रक्कम इत्यादी शेऱ्याखाली सदरच्या सर्व रक्कमा हया लोनच्या मुळ/प्रिन्सीपल रक्कमेमध्ये समाविष्ट करुन बँकेने वेळोवेळी बेकायदेशिररित्या व्याज आकारणी करुन चक्रवाढ व्याज लावून घेतलेल्या मुळ कर्जाच्या रक्कमेपेक्षा दुप्पट-तिप्पट मुळ कर्ज म्हणून बेकायदेशिररित्या बँकेचा आर्थीक फायदा होण्याकरिता वाढवलेले आहे. याउलट व्यवसाय कोविड-१९ च्या काळात पूर्णपणे बंद झालेला असल्याने उत्पन्नाचे इतर कोणतेही साधन नसताना देखील सदरचे लोनबाबत तडजोड करण्याकरिता २०२१ नंतर वेळोवेळी कर्जदार बँकेकडे संपर्क साधला असता बँकेने कोणताही प्रतिसाद दिलेला नव्हता व नाही. त्यानंतर बँकेकडे वेळोवेळी सदर लोन स्टेटमेंट तसेच लोन अॅग्रीमेंट व इतर कागदपत्रांचे कायदेशिररित्या अर्ज देवून छायांकित सत्यप्रतींची मागणी करण्याचा प्रयत्न केला असता बँक माझ्याकडून लेखी अर्जही स्विकारत नाहीत व मला वर नमुद कागदपत्रांच्या छायांकित सत्यप्रतीही देण्यास स्पष्ट नकार देवून अरेरावीची भाषा वापरून सदर लोन वसुलीचा धाक दाखवत आहात व कसल्याही प्रकारचे सहकार्य करत नाहीत.
तरी सदरील बँक व इंशुरन्स कंपनी आपसात संगणमत करुन इंशुरन्स पॉलीसीच्या रक्कमेचा मोठा अपहार बेकायदेशिररित्या केलेला असल्याने त्यांनी अनेक कर्जदाराची फसवणूक करुन गंभीर स्वरुपाचा गुन्हा केलेला आहे व ज्याचा कर्जदारास मानसिक, शारीरीक व आर्थीक त्रास सहन करावा लागत आहे तसेच नमुद रकमेच्या कर्जाच्या मुळ रक्कमेत समाविष्ट करुन त्यावरती बेकायदेशिररित्या व्याज आकारणी करुन कर्जाची मुळ रक्कम बेकायदेशिररित्या वाढवून फसवणूक व बँकेवरील असलेल्या विश्वासाला तडा लावण्याचे काम केलेले आहे.
मानसिक, शारीरीक व आर्थीक त्रास सहन करावा लागलेला आहे व लागत आहे. तसेच सदर बँक ही खाजगी सावकारांपेक्षा जास्त पटीने खातेदारांकडून व्याज आकारणी करत असल्यामुळे सामन्य खातेदाराला नाहक त्रासास सामोरे जावे लागत आहे व सदरील होणाऱ्या त्रासामुळे आत्महत्येसारखे विचार मनात येत आहेत. तरी मे. जिल्हाधिकारी साहेबांनी बँकेचे व खात्याचे सर्व स्टेटमेंट व कागदपत्रे तपासल्यास बँकेचा गैरव्यवहार व बेकायदेशिरपणा लक्षात येईल बँकेची वसुली ही खाजगी सावकारांपेक्षा नाहक असून त्यामुळे सामन्य खातेदारांची आर्थीक, मानसिक व शारीरीक पिळवणूक केली जात आहे त्याबाबतीत जाब विचारण्यास गेले असता टाळाटाळ करुन अपमानास्पद वागणूक दिली जाते तसेच दंडमशाहीची भाषा वापरली जाते कायदयात असलेल्या तरतुदीची खुलेआम पायमल्ली केली जात आहे दिनांक २७/०५/२०२५ रोजी मालमत्तेवर जप्ती करण्याचे आदेश बँकेच्या विशेष वसुली व विक्री अधिकारी उस्मानाबाद जनता सह. बँक लि. उस्मानाबाद यांनी दिनांक २४/०४/२०२५ रोजी नोटीस दिलेले आहे. सदर बेकायदेशिर नोटीसची अंमलबजावणी झाल्यास मला आत्महत्या केल्याशिवाय पर्याय उरणार नाही. त्यामुळे बँकेचे सर्व कागदपत्रे लोनअकाऊंटचे स्टेटमेंट हे मागवून घेवून त्याची तपासणी करण्यात यावी व बँक इंशुरन्स कंपनीवर गुन्हे नोंद करण्यात यावेत व खातेदारास न्याय देण्यात यावा. अन्यथा दिनांक २६/०५/२०२५ रोजी पासून मा.जिल्हाधिकारी कार्यालय, धाराशिव कार्यालयासमोर लाक्षणीक व आमरण उपोषणास बसणार आहे, त्यात काही बरेवाईट झाल्यास त्यास संपूर्णतः बँक, इंशुरन्स कंपनी व आपले कार्यालय असणार आहे याची नोंद घ्यावी. असा इशारा दिला आहे.या निवेदनावर
सोमनाथ काशिनाथ बनसोडे पत्रकार यांची स्वाक्षरी आहे.
प्रत माहितीस्तव निवेदनाच्या प्रती
१.मा.मुख्यमंत्री साहेब, महाराष्ट्र राज्य मुंबई.,
२. मा. सहकार तथा महसुल मंत्री, महाराष्ट्र राज्य मुंबई.,
३. मा. पोलीस अधिक्षक साहेब, धाराशिव.,
४. मा. पोलीस निरीक्षक, आनंद नगर पोलीस स्टेशन धाराशिव.,
५. मा. शाखाधिकारी, उस्मानाबाद जनता सह. बँक लि.धाराशिव (उस्मानाबाद)
यांना माहितीत्वस प्रत देण्यात आली आहे.