पश्चिम महाराष्ट्रातील पाणी मराठवाड्यात लवकरच;भोयरे पंपग्रहातील पाण्याचा ११ गावांना मिळणार लाभ
५ टप्प्यातून येणार रामदारा तलावात पाणी-मित्रचे उपाध्यक्ष राणाजगजिसिंह पाटील
तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी
पश्चिम महाराष्ट्रातील पाणी मराठवाड्यात लवकरच भोयरे पंपग्रहातून पावसाळ्यानंतर प्रत्यक्ष पाणी रामदारा तलवाकडे नेण्याचे काम वेगाने सुरू आहे.कृष्णा-मराठवाडा उपसा सिंचन योजना क्र.२ मधील कामाची भोयरे पंपहाऊस,जि.सोलापूर ता.मोहोळ येथे पाहणी करून कामाचा सविस्तर आढावा घेतला. तत्पूर्वी या मार्गावरील ११ गावांना या पाण्याचा लाभ होऊन ५ टप्प्यान तर रामदारा तलावामध्ये पाणी येणार असल्याची माहिती तुळजापूर विधानसभा
मतदारसंघाचे आमदार तथा मित्रा चे उपाध्यक्ष राणाजगजितसिंह पाटील
यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. धाराशिव पाटबंधारे मंडळाचे अधीक्षक अभियंता विजय थोरात, कृष्णा मराठवाडा विभागाचे कार्यकारी अभियंता अमोल नाईक, उपसा सिंचन विभागाचे प्रवीण चावरे, तुषार पाटील यांच्यासह नितीन काळे, नेताजी पाटील यांच्यासह मान्यवर आदि यावेळी उपस्थित होती.
अधीक्षक अभियंता विजय थोरात यावेळी माहिती देताना म्हणाले, पंपग्रहाचे काम अंतिम टप्प्यात आहे. त्यानंतर पंप बसवण्याच्या कामाला गती देण्यात शक्य तितक्या वेगाने हे काम पूर्ण करण्याचा आमचा प्रयत्न आहे.पंपग्रहाची पाहणी केल्यानंतर पत्रकारांची आमदार तथा मित्रा चे उपाध्यक्ष राणाजगजीतसिंह पाटील यांनी संवाद साधला. गेल्या दीड वर्षापासून पाटबंधारे मंडळाच्या अधिकाऱ्यांनी अथक परिश्रम घेऊन पंपाचे काम पूर्णत्वाकडे आणले आहे. अत्यंत सकारात्मक हेतूने सर्वाधिकारी हे काम पूर्ण करत आहेत. ऑगस्ट २०२३ मध्ये सर्वप्रथम या ठिकाणी पायाभूत कामांना सुरुवात झाली होती. त्यानंतर अधिकाऱ्यांनी हे काम जोमाने सुरू ठेवले. त्यामुळे या सर्वांचे आपण आभार मानतो. साधारणपणे पावसाळ्यानंतर या पंपग्रहातून रामदारा तलावाकडे पाणी सोडले जाईल. या मार्गावरील ११ गावे आणि ५ टप्प्यानंतर रामदारा तलावात पाणी येणार आहे. रामदारा तलावामध्ये पाणी आल्यानंतर हे पाणी पुढे उमरगा आणि लोहारा तालुक्याला देण्याचे नियोजन आहे आणि त्या दृष्टीने या भागात पाणी नेण्याकरिता उपाय योजना केली जाईल. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत या पाण्याचा लोकार्पण सोहळा करण्याचा आपला मनोदय आहे असे आमादार पाटील यावेळी म्हणाले.भोयरे पंपग्रह परिसरातील कामांची तांत्रिक माहिती पाटबंधारे मंडळाचे अधीक्षक अभियंता विजय थोरात यांनी उपस्थिताना दिली. यावेळी परिसरातील शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.