देवेंद्र फडणवीसांचा मोठा निर्णय; वन स्टेट, वन रजिस्ट्रेशनची
तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी
नोंदणी व मुद्रांक विभागाकडून ‘वन डिस्ट्रीक्ट,वन रजिस्ट्रेशन’ (एक जिल्हा- एक नोंदणी) सुविधा धाराशिव जिल्ह्यात गुरुवार दि.१ मे पासून राबविणार. त्यासाठीची अधिसूचना महसुल व वन विभागाने काढली आहे. त्यामुळे ग्रामीण भागात कोठूनही दस्त नोंदणी करता येणार आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘एक जिल्हा- एक नोंदणी’ सुविधा राबविण्याच्या सूचना नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाला दिल्या होत्या. त्यासाठी संगणकप्रणाली आणि कायद्यात बदल केले आहेत. त्यामुळे १ मे पासून त्यांची अंमलबजावणी करण्याची अधिसूचना देण्यात आल्या आहेत शहरातील जमीन, सदनिकांचे खरेदी-विक्रीचे व्यवहार कोणत्याही एका दुय्यम निबंधक कार्यालयात नोंदविता येतात. तर ग्रामीण भागातील मिळकतींची दस्त नोंदणी त्या-त्या तालुक्याच्या हद्दीमधील दुय्यम निबंधक कार्यालयात नोंदविण्याची सुविधा आहे. ‘एक जिल्हा- एक नोंदणी’नुसार जिल्ह्यातील कोणत्याही भागातील जमीन, सदनिका आणि दुकानांचा दस्त महाराष्ट्रामध्ये एकूण ४७ जिल्हे आहेत. त्या पैकी कोणत्याही एका दुय्यम निबंधक कार्यालयात नोंदविता येणार आहे.