कार-दुचाकीचा भीषण अपघात; एक गंभीर तर एक किरकोळ जखमी
दोन्हीही माझी सैनिकांची मुले आहेत.
तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी
तुळजापूर- धाराशिव राष्ट्रीय महामार्गावर तुळजापूर शहराजवळ सारागौरव (मोतीझरा तांडा) येथे धाराशिव तालुक्यातील बावी (कावलदरा) येथील माजी सरपंच जाधव तथा माझी सैनिकांची दोन युवकांच्या मोटार-सायकलला पाठीमागून आलेल्या कारने जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात अमित उर्फे शंभुराजे दत्तात्रय जाधव हा गंभीर तर नितिन पांडूरंग सोनवणे याला किरकोळ मार लागला आहे. या दोघांनाही उपजिल्हा रुग्णालयात तुळजापूर येथे उचारासाठी दाखल केले होते मात्र जास्त मार लागल्याने वैद्यकिय अधिकारी डॉ दिपक चोरमुले यांनी शासकिय जिल्हा रुग्नालय धाराशिव येथे रेफर केले आहे.या आपघातात दोघे जखमी झाले आहेत. जखमींपैकी एकाची प्रकृती चिंताजनक आहे. हा अपघात महामार्गावरील सारागौरव मोतीझरा तांडा तुळजापूर येथे अपघात झाला आहे.अपघात घडताच पोलीस प्रशासन व स्थानिकांनी तातडीने मदतकार्य सुरू केले. पुढील तपास पोलिस प्रशासन करीत आहे.