यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाचा बारावी निकाल ८५.१९%
तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी
बालाघाट शिक्षण संस्था संचलित यशवंतराव चव्हाण महाविद्यालय तुळजापूर चा फेब्रुवारी 2025 बारावी परीक्षा निकाल 85.19% लागला आहे. या यशाबद्दल विद्यार्थ्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
महाविद्यालयातील एकूण सरासरी निकाल 85.19% असून विज्ञान शाखा 95.49% वाणिज्य शाखा 90.47% कला शाखा ७३. ०७% एमसीव्हीसी शाखा 64% शाखा निहाय निकाल लागलेला आहे.
वाणिज्य शाखेमधून प्रथम
शिंदे अंकिता काशिनाथ 75.50% ही महाविद्यालयात आली आहे. ननवरे प्रगती प्रकाश 75% आणि शिंदे श्रद्धा सुधाकर 71.17% वाणिज्य शाखेतून अनुक्रमे गुणवंत आहेत.
विज्ञान शाखेमधून प्रथम पाटील ऐश्वर्या सोमेश्वर 73.17% , द्वितीय क्रमांक कुरुंद वैभवी हरी ६४% व तृतीय क्रमांक जाधव अक्षता अनंत 63.67% हे गुणवंत आहेत. कला शाखेमधून प्रथम क्रमांक अंजली शिवाजीराव वाघमारे 63.50%, द्वितीय क्रमांक देवकर धनश्री पांडुरंग 63.33% व तृतीय क्रमांक कु. जेटीथोर रमा गोरख 63% , एमसीव्हीसी शाखेमधून प्रथम क्रमांक मुंडफने प्रियंका संजय 68%, द्वितीय क्रमांक साखरे रोहन धनाजी 56.33% व तृतीय क्रमांक कोळेकर धनश्री संजय 55.17% असे अनुक्रमे गुणवंत आहेत. संस्थेचे अध्यक्ष माजी मंत्री मधुकरराव चव्हाण, संस्थेचे सचिव उल्हासदादा बोरगावकर, कार्याध्यक्ष रामदादा आलूरे, संचालक बाबुराव चव्हाण, प्राचार्य डॉ .मुकुंद गायकवाड, उपप्राचार्य डॉ. नरसिंग जाधव, कनिष्ठ महाविद्यालय उपप्राचार्य प्रा रमेश नन्नवरे यांनी गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.