आयशरच्या धडकेत म्हैस मृत्युमुखी तुळजापूर तालुक्यातील सांगवी मार्डी येथील घटना .

आयशरच्या धडकेत म्हैस मृत्युमुखी तुळजापूर तालुक्यातील सांगवी मार्डी येथील घटना .

सीएनजी पंपातील वाहनांची रांग सर्विस रोड पर्यंत आल्याने अपघात झाल्याचा ग्रामस्थांचा आरोप

तुळजापूर : प्रतिनिधी

सोलापूर -धुळे राष्ट्रीय महामार्गावरील सांगवी मार्डी या गावाजवळ रविवारी सायंकाळी पाचच्या दरम्यान तुळजापूरहून सोलापूर कडे जाणाऱ्या आयशर टेम्पो क्रमांक एम एच 13 डी क्यू 17 11 याने सांगवी मार्डी येथील बलभीम चौगुले यांच्या म्हशीला जोराची धडक दिली यामुळे म्हैस जागेवरच मृत्युमुखी पडली असून या शेतकऱ्याचे जवळपास 70 हजाराचे नुकसान झाले आहे दरम्यान यावेळी ग्रामस्थांनी येथील मोरेश्वर पेट्रोलियमच्या सीएनजी भरण्यासाठी गाड्यांची रांग सर्विस रोड पर्यंत लागत असल्याने हा अपघात झाला असल्याचे म्हटले आहे त्यामुळे पंपचालकावर कारवाई करण्याची मागणी होत असून भविष्यात मोठा अपघात झाल्यास याची जबाबदारी कोण घेणार असा प्रश्न ग्रामस्थ विचारात आहेत त्यामुळे सीएनजी भरण्यासाठीच्या सर्विस रोडवर लागणाऱ्या गाड्या तात्काळ काढण्याची मागणी पंप चालकाकडे केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!