मुंबईतील आझाद मैदानावर शुक्रवारपासून जरांगेंनी आमरण उपोषण सुरू केले आहे.
तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आझाद मैदानावर मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या ताफ्यात धाराशिव जिल्ह्याचे तीन आमदारांनी एक खासदार सामील
मनोज दादा जरांगे पाटील यांच्या ताफ्यात सामील होणार आहेत. मुंबई गाठेपर्यंत हा मराठा समाजाचा निर्धार अधिक दृढ होत असल्याचे चित्र पाहायला मिळाले.आझाद मैदानावर मराठा आरक्षण आंदोलनाला खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर व आमदार कैलास पाटील व आमदार अभिजीत पाटील यांचा जाहीर पाठिंबा
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आझाद मैदानावर मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांचे नेतृत्वाखाली सुरु असलेल्या आंदोलनाला आता जनप्रतिनिधींचा जाहीर पाठिंबा मिळू लागला आहे. तसेच धाराशिवचे लोकप्रिय खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर तसेच आमदार कैलास दादा पाटील यांनी मुंबईत हजेरी लावून मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या लढ्याला खुला पाठिंबा दिला आहे.
आझाद मैदानावर सुरू असलेल्या उपोषण व आंदोलनामुळे राज्यातील मराठा समाजात मोठी चळवळ उभी राहिली असून, विविध भागातून समाजबांधव मोठ्या संख्येने आंदोलन स्थळी दाखल होत आहेत. आंदोलनकर्त्यांचे मनोबल वाढवण्यासाठी खासदार व आमदारांनी प्रत्यक्ष ठिकाणी भेट देऊन मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांची विचारपूस केली. तसेच, मराठा समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी आपण ठामपणे पाठीशी आहोत.
आंदोलनस्थळी समाजबांधव मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रातून दाखल झाले आहेत तसेच मुंबई शहरात आरक्षणाचे घोषणाबाजी, नारे आणि जयघोषाने संपूर्ण आझाद मैदान दणाणून गेले होते. मराठा समाजाच्या या आंदोलनाला मिळत असलेला वाढता जनाधार आणि आता लोकप्रतिनिधींचा मिळालेला जाहीर पाठिंबा लक्षवेधी ठरत आहे.