खाजगी सौर ऊर्जा प्रकल्पाच्या विद्युत पोलला कर्मचाऱ्याचा शॉक लागून मृत्यू;महामार्गावर रस्ता रोको

खाजगी सौर ऊर्जा प्रकल्पाच्या विद्युत पोलला कर्मचाऱ्याचा शॉक लागून मृत्यू;महामार्गावर रस्ता रोको

२८ तासा उलटले तरी संबंधित कंपनीने दखल घेतली नाही.

तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी

तालुक्यातील माळुंब्रा येथील अठ्ठावीस वर्षिय युवक खाजगी सौर उर्जा विद्युत पोलवर कामासाठी चढला असता विजेचा शॉक लागुन मृत्यूव झाला घटना शनिवार दि.२६ एप्रिल रोजी सकाळी ११ वा.घडला या प्रकरणी खाजगी सौर उर्जा कंपनीने मयतास मदत करावी या मागणी साठी माळुंब्रा ग्रामवासियांनी रविवार दि.२७ एप्रिल रोजी दुपारी अडीच वाजता तुळजापूर – सोलापूर महामार्गरस्त्यावर रस्ता रोको आंदोलन केले या आंदोलना मुळे अर्धातास तुळजापूर सोलापूर महामार्गावरील वाहतुक विस्कळीत झाली होती.

यावेळी महामार्गाचा दोन्ही बाजुस वाहनांची लांबचा लांब रांगा लागल्या होत्य यावेळी शिवसेना नेते अमोल जाधव,माळुंब्रा सरपंच गजानन वडणे यांच्यासह माळुब्रा ग्रामवासिय उपस्थितीत होते. तहसिलदार अरविंद बोळंगे पोलिस निरक्षक अण्णासाहेब मांजरे ,तामलवाडी पोलीस ठाण्याचे ए पी आय गोकुळ ठाकूर,भाजप तालुका अध्यक्ष आनंद कंदले यांनी भेट देवुन आंदोलकांशी चर्चा केली.
या आंदोलनातील वाहनातील प्रवाशांचे मोठे हाल झाले .

या वेळी तामलवाडी पोलीस ठाण्याचे पोलिस निरक्षक गोकुळ ठाकुर यांच्यासह त्यांचे सहकार्य बंदोबस्तासाठी उपस्थित होते
कै.उत्तम वडणे यांच्या परिवारास सौरउर्जा कंपनीने अर्थिक मदत करावी अन्यथा सौर उर्जा प्रकल्पबाळूमामा परिसरात कायमस्वरूपी चालु न देण्याचा ठराव यावेळी घेण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!