रिन्यू पावर पवनचक्की कंपनीला सुरक्षा देणाऱ्या म.सु.ब. सरकारी सुरक्षा यंत्रणेवर व रिन्यू पवनचक्की कंपनीवर गुन्हा दाखल !
गंधोरा घटना प्रकरणी तब्बल ३ दिवसांनंतर ६ जणांवर गुन्हा दाखल !
तुळजापूर : प्रतिनिधी
तुळजापूर तालुक्यातील नळदुर्ग पोलीस स्टेशन हद्दीतील गंधारा येथे रिन्यू कंपनीकडे जमिनीचा मोबदला मागण्यासाठी गेलेल्या सोनटक्के कुंटुंबाला येथे तेनात असलेल्या रिन्यू पावर पवनचक्की कंपनीला सुरक्षा देणाऱ्या म.सु.ब. सरकारी सुरक्षा यंत्रणेकडून शेतकऱ्यांना वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सांगण्यावरुन शिवीगाळ करुन यात एका शेतकरी महिलेला विवस्त्र होईपर्यंत अमानुष मारहाण केली. याप्रकरणी म.सु.ब. सरकारी सुरक्षा यंत्रणेवर आणि
रिन्युव पावर पवन चक्की कंपनीतीलसहा जणांविरोधात नळदुर्ग पोलिस स्टेशन शनिवारी दि.२६ गुन्हा दाखल झाला आहे.
सदरील घटना बुधवारी दि. २३ सकाळी ११ वाजता घडली होती.तुळजापूरनामा न्यूजच्या बातम्या व राष्ट्रवादी पार्टी (अजित पवार गट) तालुकाध्यक्ष श्रीकृष्ण सूर्यवंशी यांचा पाठपुराव्यानंतर तीन दिवसानंतर या प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.
तुळजापूर तालुक्यातील गंधोरा येथील शेतकरी महिला सुनिता दिगंबर सोनटक्के यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शेती गंधारा शिवारात असून त्यावर कुंटुंबाची गुजरान होते. आमच्या शेताशेजारी रिन्यू पवनचक्की प्रकल्पाचे सवस्टेशन उभे केलेले आहे. सबस्टेशन कडे जाण्यासाठी रस्ता नव्हता. त्यावेळी रिन्यू पवन चक्की कंपनीची वाहने आमच्या शेतातून तीन ते चार महीने येजा केली होती. त्याचा मोबदला रिन्यू पवन चक्की कंपनीकडे बाकी होती. माझा मोठा मुलगा पांडुरंग सोनटक्के हा सदर मोबदला मागण्यासाठी कंपनीचे रमेश, गंगाधर व रावसाहेब शिंदे यांचेकडे मागील सात महिन्यांपासून पाठपुरावा करत
आहे. परंतु, कंपनीचे लोक शेतकरी कुटुंबाला उडवा उडवीची उत्तरे देऊन मोबदला देण्यास टाळाटाळ करत होते. बुधवारी दि.२३ सकाळी ११ वाजता शेतकरी कुटुंब महिला व त्यांचे पती दिगंबर सोनटक्के, त्यांचा मोठा मुलगा पांडुरंग यांच्या क्षेत्रातील जमीनीतून गेलेल्या वाहनाचा मोबदला मागण्यासाठी शेताचे जवळील रिन्यू कंपनीच्या सवस्टेशन येथे गेलो होतो. त्याठिकाणी जाऊन शेतकरी महिलेचा मुलगा पांडुरंग याने येथील सेक्यूरीटीवरील एकाला म्हणाला की, मला रमेश, गंगाचर व रावसाहेब शिंदे यांना
भेटायचे आहे. त्यावेळी येथील सेक्यूरीटीवाला म्हणाला की, मी वरिष्ठ अधिकाऱ्यांना बोलावून घेतो. तुम्ही तोपर्यंत थांबा असे म्हणाल्याने आम्ही त्याठिकाणी थांबलेलो होतो. त्यानंतर माझी दोन्ही लहान मुले महादेव व सहदेव हे पण त्याठिकाणी आले. थोड्या वेळाने एम.एस.एफ. सेक्यूरीटीमधील आठ ते नऊजण वरिष्ठ अधिकाऱ्यांचे सांगण्यावरून त्याठिकाणी आले व त्यांचे वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सांगण्यावरून त्यांनी आम्हाला काही न बोलता धक्काबुक्की करून मारहाण करण्यास सुरवात केली. त्यावेळी दोन सेक्यूरीटीने माझे हात धरून ठेवले व त्यांनी मला खाली पाडले. त्यावेळी सेक्यूरीटीपैकी तीनजण आमची भांडण सोडवीत होते व वाकीचे सेक्यूरीटीवाले आम्हाला मारहाण करत होते. त्यावेळी त्यांनी माझी साडी फेडून महिलेला अर्धनग्न करून मारहाण केली.महिलेच्या छातीला हात लावून महिलेच्या मनास लज्जा वाटेल असे कृत्य केले. त्यावेळी सेक्यूरीटीमध्ये असलेली शितल देवकर हिने महिलेच्या डाव्या हाताला धरून माझे बोटे पिरगळविली.
त्यावेळी शेतकरी महिलेचा मुलगा पांडुरंग जीव वाचवून त्यांच्या तावडीतून पळून जात होता. परंतू त्यांनी त्याच्यामागे पळून त्याला सुद्धा मारहाण केली. त्याचवेळी महिलेचे पती यांच्या डोक्यात रोडने मुका मार दिला. त्याचदरम्यान कोणीतरी पोलीसांना फोनकरून बोलावून घेतले. पोलीस त्याठिकाणी आल्यानंतर त्यांनी भांडण सोडवले. याप्रकरणी सहा जणांविरोधात नळदुर्ग पोलिस ठाण्यात भान्यासं २०२३ अन्वये ७४, ११८ (१), ११५ (२), १८९ (२), १९१ (२) १९० अन्वये गुन्हा नोंदविला.