तुळजापूर;मंगरूळ येथे अवैध दारू विक्री ९६६० हजारांचा मुद्देमाल जप्त
तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी
तालुक्यातील मंगरूळ येथील विराज बियर शॉपीच्या पाठीमागे एकव्यक्ती अवैधरित्या देशी व विदेशी दारू विक्रीकरीत आसल्याची माहिती मिळताच, तुळजापूर पोलिसांनी सापळा रचून ९६६० हजार रु मुद्देमालासह आरोपीस ताब्यात घेतले आहे.आरोपीचे नाव धीरज धर्मराज लबडे आहे. हि कारवाई पोलिस निरीक्षक आण्णासाहेब मांजरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक विजय थोटे, पोलिस आम्लदार अरुण शिरगिरे,सूरज पांचाळ यांनी केली आहे.पोलिसांच्या धडक कारवाईमुळे अवैध दारू विक्रेत्यांचे ढाबे दणाणले.