डीजेमुक्त मिरवणुका व गणेशोत्सवासाठी प्रयत्न,२९ रोजी तुळजापूराच्या वतीने लाक्षणिक उपोषण
तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी
तालुक्यासह शहरातील “डीजे”मुक्त गणेश उत्सव व मिरवणूक व्हावी या मागणीसाठी तुळजापूर शहराच्या वतीने एक दिवसाचे लाक्षणिक
उपोषण दि.२६ ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी, पोलिस उपविभागीय अधिकारी,तुळजापूर पोलीस ठाणे येथे शहराच्या वतीने निवेदन देण्यात आले आहे.
तुळजापूर शहर हे तीर्थक्षेत्र असल्यामुळे या ठिकाणी बाहेरहून येणात्या ज्येष्ठ व लहान भक्तांची संख्या फार मोठी आहे. आणि आपल्या गावात सर्वच मिरवणुका भवानी रोड वरून मंदिरा कडे जातात. या भागात कायमच भक्तांची गर्दी असते. आंणि मग या “डिजे” व लेझर लाईट असणाऱ्या मिरवणुकांचा भाविकांवर वाईट परिणाम होतो.त्याच बरोबर तुळजापूर मधील ज्येष्ठ नागरिकांना व विद्यार्थ्यांना, व लहान मुलांनाही फार त्रास होतो आहे. सर्वच मिरवणुका मध्ये मोठे साउंड असणारे डीजे व तीक्ष्ण लेझर असणारे फोकस वापरले जातात. त्यामुळे सर्व नागरिकांच्या डोळे, कान, नाक, व शरीर इत्यादी वर वाईट परिणाम होतात व होत आहेत. तरी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी डीजे व लेझर वापरणाऱ्यााना गणेश उत्सव काळात मिरवणुकीची परवानगी देऊ नये.
तुळजापूर शहराच्या वतीने तहसील कार्यालय तुळजापूर समोर दि.२९ ऑगस्ट रोजी एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करणार यावेळी उत्तम अमृतराव,मारुती नाईकवाडी,अशोक साळुंके,श्रीकांत वाघे,बाळासाहेब कुतवळ,किरण खपले,नवनाथ जगताप,प्रकाश हुंडेकरी,शिवाजी हाके,भारत जाधव,सुनील बोदले,शशिकांत लाडापुढे,अंबादास वराडे,रवींद्र साळुंके आदींच्या निवेदनावर स्वाक्षऱ्या आहेत.