रिन्यू पावर पवनचक्की कंपनीला सुरक्षा देणाऱ्या म.सु.ब. सरकारी सुरक्षा यंत्रणेकडून शेतकऱ्यांना अमानुष मारहाण.
रिन्यू पवनचक्की कंपनी व महाराष्ट्र सुरक्षा बल यांचा संयुक्तपणे शेतकर्यांवर अन्याय
तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी
तुळजापूर तालुक्यातील गंधोरा येथील रिन्यु पवनचक्की कंपनीच्या विद्युत उपकेंद्राच्या प्रवेशद्वारा समोरच महाराष्ट्र सुरक्षा बल या महाराष्ट्र शासनाने पवनचक्की कंपनीला पुरवीलेल्या सरकारी सुरक्षा यंत्रणेकडून पवनचक्की बाधीत सोनटक्के या शेतकरी महिला कुंटुबाला बुधवार दि २३ रोजी म.सु.ब. सुरक्षा बलाकडुन सोनटक्के कुटुंबातील पुरुष व महिला शेतकऱ्यांना विवस्त्र होईपर्यंत हजारो ग्रामस्थांच्या समोर बेदम मारहाण झालेली आहे व सदर घटनेची चित्रफीत राज्यभर व्हायरल होत असुन घडलेल्या गंभीर मारहाणीची सर्वच स्तरातून घोर निंदा होत आहे.
घडलेला प्रकार हा अत्यंत निंदनीय असून, पवनचक्की बाधीत शेतकऱ्यांमध्ये दहशत पसरवीण्याच्या उद्देशानेच रिन्यु कंपनीच्या वरीष्ठ अधीकारी वर्गाच्या सांगण्यावरूनच रिन्यु कंपनीकडून मिळणाऱ्या आर्थिक पाठबळाच्या आशेवर महाराष्ट्र सुरक्षा बल च्या सुरक्षा रक्षकांनी कायदा हातात घेऊन शुल्लक कारणावरून गरीब शेतकरी महिलाकुटुंबातील आईबहीनीच्या अब्रुची लक्तरे साडी फिटे पर्यंत मारहाण करून रिन्यु कंपनीच्या उपकेंद्रावर टांगले असुन एकीकडे महाराष्ट्र शासन लाडकी बहीणीचें सरकार अश्या घोषणा करते व प्रत्यक्षात मात्र सरकारचेच सुरक्षा रक्षक पवनचक्की कंपन्यांची दलाली खाऊन लाडक्या बहीणीला विवस्त्र होईपर्यंत मारहाण करतात त्यामुळे जिल्ह्याभर शेतकऱ्यांमध्ये सरकार विरोधात संतापाची लाट उसळली असून पवनचक्की कंपन्यांच्या दादागिरीला लगाम कोण घालणार असा प्रश्न उपस्थित होतो आहे. बिड जिल्ह्यातील स्वर्गीय संतोष देशमुख हत्याकांड याच पवनचक्कीच्या कामातून होणाऱ्या पैश्यासाठी झालेले असुन सदर पवनचक्की कंपन्यांनी पैश्याच्या जोरावर संपूर्ण प्रशासन विकत घेतले की काय असा प्रश्न विचारला जात असुन रिन्यु कंपनी शेकडो वकील, गावगुंड, बाउन्सर, हफ्तेखोर पोलीस व महसुली यंत्रणा, गुत्तेदार पुढारी, गावागावांतील भिकारचोट दलाल, नामांकित गुंड व आता महाराष्ट्र सुरक्षा बल इत्यादी यंत्रणांना हाताशी धरून शेतकरी वर्गाचे अतोनात नुकसान करत असुन प्रशासन मात्र रिन्यु कंपनीकडुन मिळणाऱ्या आर्थिक पाठबळामुळे झारीतील शुक्राचार्याची भुमीका वठवीन्यात व्यस्त असल्याचे वास्तव नाकारता येणार नसुन शेतकऱ्यांनी पवनचक्कीच्या विरोधात तक्रार केल्यास प्रशासन एकपात्री नाटकाचा प्रयोग करून शेतकऱ्यांचे वाटोळं करत असल्याचे दुर्दैवी चित्र निर्माण झाले आहे. संपूर्ण जिल्हाभर पवनचक्की उभारणीचे पेव फुटले असून जागोजागी शेतकऱ्यांना कधी पोलीस तर कधी खासगी बाउन्सर व गावगुंड भाड्याने लाऊन मारहाण करुनच जबरदस्तीने पवनचक्की कंपन्यांची कामे चालु आहेत.
गंधोरा येथील सोनटक्के कुटुंबीयांना झालेली अमानुष मारहाण ही रिन्यु कंपनीच्या अधिकाऱ्यांच्या सांगण्यावरूनच म.सु.ब. या सरकारी सुरक्षा यंत्रणेकडून झालेली असुन आता मात्र शेतकऱ्यांच्या सहनशीलतेचा अंत झाल्याची चर्चा गंधोरा परीसरातील शेतकऱ्यांकडून ऐकण्यात येत आहे त्यामुळे रिन्यु कंपनीने वेळीच सावध व्हावे अन्यथा तालुक्यातील शेतकरी जर का एकदा खवळले तर रिन्यु कंपनीच्या मुठभर अधीकार्यांना तालुक्यात फिरणे मुश्कील होईल अशी प्रतिक्रिया आता शेतकरी नोंदवीत आहेत तर नळदुर्ग पोलीसांची भुमीका पुर्वीपासूनच पवनचक्की बाधीत शेतकरीवीरोधी आहे कारण मागील प्रत्येक प्रकरणात नळदुर्ग पोलीसांनी रिन्यु कंपनीच्या आर्थिक दबावामुळे स्पष्टपणे शेतकरी विरोधी भुमीका घेतलेली असुन गंधोरा येथील मारहाण प्रकरणी नळदुर्ग पोलीसांनी महाराष्ट्र सुरक्षा बल यांच्या सुरक्षा रक्षकांवरती व त्यांचे शिकवीते धनी रिन्यु कंपनीचे अधीकारी यांचेवर मारहाणीचे व महीला विनयभंगाचे गुन्हे दाखल करणे अपेक्षीत असताना उलट शेतकऱ्यांनाच लक्ष केल्याचे दिसून येत आहे. सदर मारहाण प्रकरणाचा व्हिडिओ संपूर्ण महाराष्ट्रात व्हायरल झाला असताना व सदर व्हिडिओत स्पष्टपणे झालेली बेदम मारहाण व महीलेचा झालेला विनयभंग इत्यादी गोष्टी नळदुर्ग पोलीसांना कदाचीत रिन्यु कंपनीच्या आर्थिक मोतीबिंदू मुळे दिसत नसाव्यात अशी चर्चा तालुक्यात सुरु असुन आता बिड जिल्ह्यातील स्वर्गीय संतोष देशमुख हत्याकांडाप्रमाणेच एखादे हत्याकांड रिन्यु कंपनीने पाळलेल्या गुंडाकडुन झाल्यावरच पोलीस व इतर प्रशासन जागे होईल एवढीच अपेक्षा आता शेतकरी बाळगून आहेत.
गंधोरा येथील धनगर समाजाचे सोनटक्के कुटुंबियांना झालेल्या जबर मारहाणीमुळे शेतकरी वर्गात प्रचंड नाराजी असुन रिन्यु पवनचक्की कंपनीच्या अर्थपूर्ण संबंधामुळे प्रशासन मात्र जणु काही घडलेच नाही या थाटात वावरताना दिसुन येत आहे परंतु मुळातच रिन्यु कंपनीच्या बाउन्सर, गावगुंड, भ्रष्ट पोलीस यंत्रणेकडुन मारहाणीच्या अनेक घटना या अगोदरही घडल्या असून रिन्यु कंपनीचे मनोबल दिवसेंदिवस वाढत चालले असून आता फक्त एखाद्या पवनचक्की बाधीत शेतकर्यांचा मुडदा तेवढा रिन्यु कंपनीच्या गुंडाकडुन पडायचा तेवढा बाकी राहीला आहे त्यामुळे वेळीच प्रशासनाने सावध होऊन या रिन्यु कंपनीच्या प्रकल्प अधिकारी व महाराष्ट्र सुरक्षा बल यांचे सुरक्षा रक्षक यांचेवर जबरी मारहाण व महीलेचा विनयभंग केल्याप्रकरणी गुन्हे दाखल करुन रिन्यु कंपनीचे प्रकल्प अधिकारी व मसुब चे सुरक्षा रक्षक यांना तुरुंगात टाकण्यात यावे अशी मागणी तुळजापूर तालुक्यातील जनतेतून होत आहे यावर आता प्रशासन कठोर निर्णय घेते की नेहमीप्रमाणेच शेतकऱ्यांनाच चोर ठरवुन रिन्यु कंपनीला संन्यासी ठरवते ते येणारा काळच ठरवेल.
शेतकरी महिलेचा व्हिडीओ पहा