श्री तुळजाभवानी मंदिरात संशयित व्यक्ती घटनाक्रम

श्री तुळजाभवानी मंदिरात संशयित व्यक्ती घटनाक्रम

तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी

दिनांक २३ एप्रिल. वार बुधवार. रोजी वेळ सायं. ५:२७ ते ५:३४ या दरम्यान चार ते पाच व्यक्ती संशयित हालचाली करताना दर्शन मंडपातील तिसऱ्या मजल्यावरील प्रवेशद्वाराला सुरक्षा रक्षक शिवाजी उमाप, सुरक्षा फील्ड ऑफिसर बिभिषण माने व सुरक्षा विभाग प्रोजेक्ट मॅनेजर संग्राम पाटील यांना राऊंड चेकिंगला जात असताना आढळून आल्या. सुरक्षा रक्षकांनी त्या संशयित व्यक्तींची चौकशी केली असता ते फिरवा फिरविची उत्तरे देऊ लागले. सुरक्षा अधिकाऱ्यांनी त्यांना तुम्ही इथे थांबू नका, दर्शन झाले असेल तर तात्काळ मंदिर परिसराबाहेर जा असे सांगितले व दोन सुरक्षा रक्षक त्यांच्यावरती लक्ष ठेवण्यासाठी पाठवले. त्या संशयित व्यक्ती धर्मदर्शन रांगेतून दर्शनासाठी गेल्या.

दिनांक २४ एप्रिल. वार गुरुवार. वेळ दुपारी ३:४० ते ३:४६ या दरम्यान पुन्हा एकदा त्याच संशयित व्यक्ती दर्शन मंडपातील तिसऱ्या मजल्याच्या प्रवेशद्वाराला आढळून आल्या. या वेळी सुरक्षा विभाग फील्ड ऑफिसर बिभीषण माने, SISPL चे सुरक्षा निरीक्षक कमलाकर पवार व सुरक्षा रक्षक शिवाजी उमाप हे राऊंड चेकिंगला जात असताना संशयित व्यक्ती निदर्शनास आल्या लागलीच कमलाकर पवार यांनी त्यांना हटकले व सांगितले की तुम्ही इथे कशाला थांबला आहात? त्यांना त्यांची ओळख विचारली असता ते फिरवा फीरवीची उत्तरे देऊ लागले. त्यांना तेथे थांबू नका, मंदिराच्या बाहेर जा असे सांगितले व तत्काळ याचा रिपोर्ट मंदिर पोलिस चौकीचे सहायक पोलीस निरीक्षक अर्जुन चौधर व पोलीस कर्मचारी सोनटक्के यांना दिला.

दिनांक २५ एप्रिल. वार शुक्रवार. वेळ सायं. ४:५२ ते ५:०६ या दरम्यान मंदिर परिसरात पुन्हा त्याच संशयित व्यक्ती निदर्शनास आल्या. तात्काळ चार सुरक्षा रक्षकांच्या मदतीने त्या सर्व संशयित व्यक्तींना घेऊन प्रथम मंदिर पोलिस चौकी येथे नेण्यात आले व नंतर मंदिर पोलिस चौकी पोलिसांच्या सूचनेनुसार त्या संशयित व्यक्तींना तुळजापूर शहर पोलिस चौकी येथे नेण्यात आले. तेथे त्या ७ संशयित व्यक्तींना पुढील कारवाईसाठी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. महिला सुरक्षा रक्षक शीतल केचे, सविता माने व पुरुष सुरक्षा रक्षक हरिदास क्षीरसागर व रोहित सुरवसे हे संशयित व्यक्तींना पोलिस चौकी येथे घेऊन जात असताना सोबत होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!