पवनचक्की कंपनीला सेक्युरिटी देणाऱ्या MSF सेक्युरिटीची ची महिला शेतकऱ्याला विवस्त्र होईपर्यंत मारहाण
तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी
तालुक्यातील गंधोरा येथील पवनचक्की कंपनीचा सबस्टेशन समोर सेक्युरेटी गार्डकडून शेतकरी कुंटुबाला बुधवार दि २३ रोजी पवनचक्की कंपनीला सेक्युरिटी देणाऱ्या MSF सेक्युरिटीची ची महिला शेतकऱ्याला विवस्त्र होईपर्यंत मारहाण अशा MSF सेक्युरिटीची जिल्हाधिकाऱ्यांनी निलंबनाची कारवाई करावी अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.
मारहाण चा व्हीडीओ शोशल मिडीयावर प्रचंड व्हायरल झाल्याने हा प्रकार म्हणजे मुळशी पँटर्न तालुक्यात येत असल्याची चर्चा चर्चिली जात आहे.
गंधोरा ता तुळजापूर येथे एक शेतकरी कुंटुब भावाला कामावरुन काढण्या बाबतीत विचारणा करावयास गेले असता त्यांना मारहाण झाल्याचा घटनेचा व्हीडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला असुन यात सदरील शेतकरी कुंटुंबातील महिला आपल्या लेकरांना मारु नका म्हणत लेकरांचा अंगावर पडली असतानाही मारहाण केल्याचा आरोप कुंटुंबाःन कडुन केला जात आहे.
विशेष म्हणजे सदरील शेतकरी महिलेची अंगावरची साडी फिटेपर्यंत मार हाण केली अशा या वेळी खाली जमिनीवर पडल्याचे दिसत आहे या घटनेने लाडक्या बहीणानी येथे सुरक्षित नसल्याचे बोलले जात आहे या प्रकारा बाबतीत तालुक्यातील तीव्र संताप व्यक्त होत असुन शेतकऱ्यांना वाली राहीलाच नाही अशा संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.
MSF सेक्युरिटीची निलंबनाची कारवाई करावी
महाराष्ट्र सुरक्षा दल (MSF) ही एक सरकारी सुरक्षा संस्था आहे , २०१० मध्ये महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ कायदा, २०१० अंतर्गत स्थापन झाली आहे. पवनचक्की कंपनीला सेक्युरिटी देणाऱ्या MSF सेक्युरिटीची ची महिला शेतकऱ्याला विवस्त्र होईपर्यंत मारहाण करण्याचा अधिकार दिला कोणी ? संबंधित पवनचक्कीच्या अधिकाऱ्यावर कडक कारवाई करून MSF सेक्युरिटीची गार्डची निलंबनाची कारवाई जिल्हाधिकाऱ्यांनी अशी मागणी त्रस्त शेतकरी वर्गातून होत आहे.