विठ्ठल नागनाथ काळे, महाराष्ट्र आणि गोवा या दोन राज्यांचा Best Actor Award घेणार पहिला अभिनेता
महाराष्ट्र राज्यचा ५८ वा चित्रपट पुरस्कार सोहळा २०२४ मधे मुंबई येथे संपन्न झाला होता. या सोहळ्यात अभिनेता विठ्ठल काळे याला बापल्योक या मराठी भाषेतील चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता, सर्वोत्कृष्ट कथा, आणि सर्वोत्कृष्ट संवाद असे महाराष्ट्र शासनाचे एकूण ३ पुरस्कार मिळाले होते.
त्याच बरोबर, गोवा राज्य सरकारचा , १० वा गोवा राज्य चित्रपट पुरस्कार सोहळा १४ ते १७ ऑगस्ट २०२५ रोजी पणजी येथे संपन्न झाला. या मानाच्या पुरस्कार सोहळ्यात अभिनेता विठ्ठल काळे याला “काजरो” (The Bitter tree ) या कोंकणी भाषेत असलेल्या चित्रपटातील अभिनयासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेता ज्युरी पुरस्कार मिळाला आहे.
महाराष्ट्र आणि गोवा या दोन्ही राज्याचा सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्कार मिळवणारा विठ्ठल काळे हा पहिला अभिनेता ठरला आहे. कोंकणी भाषा येत नसतानाही त्या भाषेचा अभ्यास करून त्याने ही भूमिका साकारली आहे. काजरो या कोंकणी चित्रपटाला ६७ वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला आहे.
विठ्ठल ने बापल्योक, पुनःश्च हरिओम , लाईक आणि सब्स्क्राईब, घर बंदूक बिर्याणी, राक्षस, Hotel Mumbai या चित्रपट आणि मानवत मार्डर्स, या वेब सीरीज मध्ये लक्षवेधी अभिनय केला आहे.
विठ्ठल ने दोन्ही राज्य, निवड समिती , परीक्षक, दिग्दर्शक, सहकलाकार, आणि निर्माते यांचे आभार मानत आनंद व्यक्त केला. पुरस्कारांमुळे माझ्यावर जबाबदारी आणखीन वाढली आहे, अशाच उत्तमोत्तम चित्रपटांमध्ये काम करण्याची संधी मिळावी ही इच्छा देखील व्यक्त केली आहे.