आ . प्रविण दरेकर यांची विधीमंडळ आश्वासक समितीच्या अध्यक्षपदी निवड, प्रशांत नवगिरे यांनी केला सत्कार
तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी
महाराष्ट्र विधानपरिषद गटनेते, राज्याचे माजी विरोधी पक्ष नेते, मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष ,भाजपा नेते आमदार प्रविण दरेकर यांची महाराष्ट्र विधीमंडळ आश्वासक समितीच्या अध्यक्षपदी काल निवड करण्यात आली .
तळागाळातील सामान्य कार्यकर्त्यांची जाण असणारा नेता, सामान्यांच्या अडचणी तात्काळ सोडविणारा नेता तसेच मुख्यमंत्र्यांचे अत्यंत विश्वासु म्हणून ओळखले जाणारे आमदार प्रविण दरेकर यांची नुकतीच महाराष्ट्र विधीमंडळ आश्वासक समितीच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली .
या निवडीमुळे धाराशिव जिल्ह्यातील भाजपा चे युवा नेते प्रशांत नवगिरे यांनी आमदार प्रविण दरेकर यांचा मुंबईतील चर्चगेट येथील त्यांच्या कर्तव्यपथ कार्यालयात सत्कार केला .
यावेळी त्यांच्यासोबत पंकज नवगिरे, साताराचे अजिंक्य महाडीक , सोलापूरचे बाळासाहेब सुरवसे, बीडचे एकनाथ कदम यांच्यासह जिल्हयातील कार्यकर्ते उपस्थित होते .