भूम तालुक्यातील वांगी येथे जलतारा प्रकल्पचा प्रारंभ
तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी
जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार व जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी रवींद्र माने यांनी दिलेल्या सूचनेप्रमाणे महत्त्वकांशी जलतारा प्रकल्पचा प्रारंभ भूमच्या उपविभागीय अधिकारी वैशाली पाटील,भूम, तहसीलदार श्री.जयवंत पाटील,अतुल ढवळे तालुका कृषि अधिकारी भूम यांच्या उपस्थितीत भूम तालुक्यातील वांगी येथील श्री अमोल शिंदे यांच्या शेतात लोकसहभागातून जलतारा प्रकल्प तयार करण्यात आला.यावेळी कृषि अधिकारी हर्षल यादव,कृषि पर्यवेक्षक रामदास शिंदे,कृषि सहाय्यक श्रीमती खराडे,श्रीमती जाधव,श्रीमती देशमुख व अक्षय गायकवाड उपस्थित होते.