सातबारावरील फेरफार नोंद घेण्यासाठी सलगरा मंडळ अधिकाऱ्याची पैशाची आपेक्षा आहे का ?
काक्रंबा परिसरातला तलाठी व सलगरा मंडळ अधिकाऱ्यांनी फेरनामंजूर ?
तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी
तुळजापूर तालुक्यातील सलगरा महसूल मंडळअंतर्गत असणाऱ्या काक्रंबा सज्जा मधील जमिन कायदेशीररित्या परिपूर्ण कागदपत्रे फेरमंजूर साठी दिल्या नंतर ही फेरमंजूरीसाठी तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांना आर्थिक स्वरूपाची आपेक्षा आहे का ? मग दि.१६ एप्रिल रोजी दहा ते अकरा फेरमंजूर करण्यात
आले आहेत मग तुळजापूर तालुक्यातील काक्रंबा येथिल जमीन ग.नं. ५०५ मधील जमीन निवृत्ती पांडुरंग क्षिरसागर यांचा १ हे १५ आर,जाणून बुजून फेरमंजूर करण्यात आलेला नाही.अशा तलाठी व मंडळ अधिकाऱ्यावर वरिष्ठ अधिकाऱ्यांचा अंकुश असणे गरजेचे आहे.
वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशाला केराची टोपली
मंडळ अधिकाऱ्यांनी फेरमंजुरीसाठी पैशाची मागणी करणे हे गैरकानूनी आणि भ्रष्टाचार आहे. अशा प्रकारची मागणी झाल्यास, तुळजापूर तालुक्यातील नागरिकानी स्थानिक तहसील कार्यालयात किंवा लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार दाखल करा.