तुळजापूर तालुक्यातील १०८ ग्रामपंचायतीची सरपंच पदाचे आरक्षण जाहीर .

तुळजापूर तालुक्यातील १०८ ग्रामपंचायतीची सरपंच पदाचे आरक्षण जाहीर .

तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी

तुळजापूर तालुक्यातील १०८ ग्रामपंचायतीसाठी २०२५ ते २०३० पर्यंत च्या निवडणूकीसाठीचे सरपंच पदाचे आरक्षण अभियांत्रिकी महाविद्यालय,स्पोर्ट हॉल तुळजापूर येथे जाहीर करण्यात आले .

उपजिल्हाधिकारी प्रवीण धरमकर यांच्या उपस्थितीत हे आरक्षण जाहीर करण्यात आले.
यामध्ये ६० ठिकाणी सर्वसाधारण सरपंच पद आरक्षित असून २९ ग्रामपंचायत मध्ये नागरिकांचा मागास प्रवर्ग यासाठी सरपंच आरक्षित ठेवण्यात आले आहे तर १८ ग्रामपंचायत मध्ये अनुसूचित जाती जमाती व एक ठिकाणी अनुसूचित जातीसाठी हे सरपंच पद आरक्षित असणार आहे तसेच महिलांना पन्नास टक्के आरक्षण असणार आहे. सर्वप्रथम तहसीलदार अरविंद बोळंगे यांनी १९९५ पासून सुरू असलेल्या आरक्षण पद्धती दाखवत त्यानुसार आरक्षण जाहीर केले तसेच काही ठिकाणी चिट्ठी टाकून ही हे आरक्षण जाहीर करण्यात आले .
सिंदफळ ,मसला, काटगाव, जळकोट ,इटकळ ,अणदूर या महत्त्वाच्या ग्रामपंचायतीमध्ये सर्वसाधारण स्त्री असे सरपंच पद असणार आहे यावेळी ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणावर नागरिक आले होते काही जणांचे आरक्षण मनासारखे निघाल्यानंतर त्यांचा जल्लोष झाला तर काहीजणांचा हिरमोड झाल्याने दिसून आला यावेळी मंगेश वाघोलीकर, प्रशांत मलगे, दत्ता नन्नवरे ,सुनिल हत्तीकर या अधिकाऱ्या नंतर यांच्यासह विविध पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!