उमरगा चिवरी येथील डॉ.नारायण सावंत यांनी एम.बी.बी.एस.परिक्षेत उज्वल यश मिळवले.
प्रतिकुल परिस्थितीवर मात करत केले आई वडिलांचे स्वप्न पूर्ण
तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी
तुळजापुर तालुक्यातील उमरगा (चिवरी ) येथील डॉ.नारायण विजयकुमार सावंत यांनी मेडिकल कॉलेज पुणे येथे एम.बी.बी.एस. परीक्षा २०२५ मध्ये झालेल्या परिक्षेत प्रथम श्रेणीत उतीर्ण होऊन एम बी.बी.एस. डॉक्टर ही पदवी प्राप्त केल्याने त्यांचे तालुक्यातुन सर्वत्र कौतुक केले जात आहे. डॉ.नारायण विजयकुमार सावंत हे तुळजापुर तालुक्यातील उमरगा – चिवरी येथील रहिवाशी असुन त्यांनी इयता पहिली ते सातवी पर्यंतचे शिक्षण हे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा उमरगा येथे पूर्ण केले तर पुढील शिक्षणासाठी ते ११ वी ते १२ वी चंद्रभानु सोनवणे कॉलेज उक्कडगाव येथे विद्यालयात घेतले तर नीट परीक्षेत कुठलेही टिव्हेशन न घेता नीट परीक्षेत पहिल्याच प्रयत्नात ५८४ गुण घेऊन बी जे मेडिकल कॉलेज पुणे येथे डिग्री प्राप्त केली. यावर्षी २०२५ मध्ये झालेल्या शेवटच्या वर्षाच्या परिक्षेची परिक्षा देऊन त्यानी यश संपादन केले.या यशामध्ये मार्गदर्शन करणारे
मोठा भाऊ दीपक सावंत जीएस टी विभागात excutiv ऑफिसर त्याच्या मार्गदर्शन लाभले आणि आई वडिलांचे स्वप्न पूर्ण केले असल्याने गाव परिसरातून डॉ. नारायण विजयकुमार सावंत यांचे मित्र अफसर इनामदार तसेचे सर्वत्र विभागातून कौतुक करीत अभिनंदन केले जात आहे. पहातरहा तुळजापूरनामा न्युज चॅनल धाराशिव -तुळजापूर