शहरात निदर्शनास आलेल्या सायाळ वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी जंगलात सोडून केली मुक्तता !
पानवट्यामध्ये पाणी नसल्यामुळे शहरात आलेल्या सायाळ प्राण्याची केली मुक्तता !
तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी
तुळजापूर शहरात लातूर रोड परिसरातील उपजिल्हा रुग्णालय समोर निदर्शनास आलेला सायाळ प्राण्याची शिकार होवूनये म्हणून किंवा शिकाराच्या जाळ्यात सायाळ अडकूने म्हणून या सायाळाची मुक्तता तुळजापूर वन विभागाचे अधिकारी विनोद पाटील व त्यांच्याकर्मचाऱ्यांनी त्याला सुरक्षितपणे आपसिंगा परिसरातील वनक्षेत्राताच्या अधिवासात सोडण्यात आले आहे. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून तुळजापूर तालुक्याच्या वन क्षेत्रातील भागात काही शिकारी वन्यप्राण्यांना जाळ्यात अडकवण्यासाठी फासे टाकत आहेत, अशा शिकाऱ्यांचा वन विभागाने शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी तालुक्यातून होत आहे.