हरिनाम सप्ताह:हणुमान नगर येथे शनिवारपासून अखंड हरिनाम सप्ताह; ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा
तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी
तुळजापूर शहरात जय हणुमान नगर,मस्के प्लॉटिंग परिसरात हनुमान जयंतीच्या पार्श्वभूमीवर
मागील २ ते३ वर्षापासून अखंडपणे सुरू असलेल्या या उत्सव समितीच्या आयोजकांनी
हनुमान जयंतीच्या निमित्त अखंड हरिनाम सप्ताह ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा दि.१२ एप्रिल रोजी आयोजित केला आहे.याशिवाय सात दिवस काकड आरती, विष्णुसहस्त्रनाम, ज्ञानेश्वरी पारायण, गाथा भजन, सावता महाराज चरित्र पठण, हरिपाठ, हरीकिर्तन, जागर असे विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्यासाठी प्रमुख व्यासपीठ म्हणून ह.भ.प.अंगद शिवराम महाराज ढेरे तसेचे ह.भ.प. रामभाऊ गोरे मामा महाराज यांची उपस्थिती लाभणार आहे.
भारुडाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे.राष्ट्रीय एकात्मतेची झलक दाखवितात.यंदा मात्र मोठ्या प्रमाणावर कीर्तन सोहळा होत असून भाविकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन जय हणुमान नगर,मस्के प्लॉटिंग तुळजापूरकर आयोजकांनी केले आहे.