काँग्रेस शहर कमिटीच्य उपाध्यक्ष पदी किरण यादव यांच्या निवडीने काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आता ‘पॉवरफुल’!
तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्या आदेशाने व महाराष्ट्र राज्याचे माजी महसुल मंत्री बाळासाहेब थोरात,माजी वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित विलासराव देशमुख यांच्या नेतृत्वात व मार्गदर्शनाखाली आपण काँग्रेस पक्ष वाढीसाठी परिश्रम घ्याल व काँग्रेस पक्षाचे व्येयधोरण विचार, ग्रामीण भागात तसेच कार्यकर्त्या पर्यत पोहचवाल अशी आपेक्षा ठेवत तुळजापूर शहर काँग्रेस कमिटीच्या उपाध्यक्ष पदी किरण यादव यांची निवड करत त्यांच्या निवडीचे पत्र जितेंद्रजी देहाडे, माजी आमदार विश्वनाथ चाकोते,जिल्हाध्यक्ष ॲड धिरज पाटील यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला
यावेळी अमोल कुतवळ तसे जिल्ह्यातील पदाधिकारी आदि उपस्थित होते.पक्ष बळकटीसाठी तसेच पक्ष मजबूत करण्यासाठी, पक्षाची ध्येय धोरणे सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी सहकार्य राहील असा विश्वास यावेळी नुतन शहर उपाध्यक्ष किरण यादव यांनी व्यक्त केला आहे.