धाराशिव तालुक्यातील कावलदरा (बावी) लुटमार प्रकरणी तीन तासात चार आरोपी ताब्यात तीन फरार – पोलिस निरीक्षक शेळके
तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी
धाराशीव तालुक्यातील कावलदरा परिसरात गुरुवार दि. १० रोजी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास अज्ञात चोरट्याने चारचाकी वहानांना आडकून या वाहनांमधील किमती वस्तु लुटल्याची घटना घडल्याने एकच खळबळ उडाली आहे,
ग्रामीण पोलिस ठाण्याच्या पोलिसांनी तात्काळ तपास चालु केला असता तीन तासात चार आरोपींना पोलिसांनी येडशी टोल नाका येथे ताब्यात घेतले सदरील आरोपी तेरखडा परिसरातील रेकाँर्ड वरील गुन्हेगार असल्याचे कळत आहे .
या बाबतीत अधिक माहीती अशी की धाराशीव तालुक्यातील कावलदरा येथील रस्त्यावर दि १० रोजी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास तोंडाला मास्क लावलेल्या चोरांनी रस्त्यावर दगड व जॉक टाकुन रस्ता अडवण्याचा प्रयत्न केला गाडीचा वेग कमी होताच
चार ते पाच चार चाकी वहानांचे टायर फोडुन गाडीतील प्रवाशांना मारहाण करुन गाडीतील आयफोन ,लॅपटॉप ,पैसे, सोने दागीने लुटल्याचे निदर्शनार आली आहे.सदरील घटना ४ वाजून ५ मिनिटानी फोन येताच तुळजापूर पोलिस स्टेशनचे पोलिस ७ मिनीटांत घटनास्थळी पोहचताच पोलिस गाडीच्या गाडीचा आवाजाने चोरटे पसार झाले.या घटनेमुळे परिसरातील नागरिक भयभीत झाले आहेत.पुढील तपास धाराशिव ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शेळके व त्यांची टीम करीत आहे.