जि.प. कें. प्रा. शाळा (तीर्थ खु.) येथे स्नेहसंमेलन संपन्न
तुळजापूर : प्रतिनिधी
तुळजापूर तालुक्यातील तीर्थ (खुर्द) येथे दि.८ एप्रिल रोजी जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा (तीर्थ) खुर्द येथे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न झाले.
पहिली ते इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांनी आपल्या कलागुणांचा अविष्कार सादर केला. मनोरंजन, प्रदूषण समस्या, वृक्षारोपण, अंधश्रद्धा, लोककला, गोंधळ नृत्य, लावणी, वासुदेव, देशभक्तीपर इत्यादी गीतांवर नृत्य सादर करण्यात आले.
वार्षिक स्नेहसंमेलन यशस्वी करण्यासाठी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री हणमंत जाधव,सदस्य श्री बाळासाहेब पाटील व सर्व सदस्य,तसेच मुख्याध्यापिका अंजली कावरे, लक्ष्मण साखरे, रेखा गोरे, राजेश्वरी भुताळे, सोमनाथ केवटे यांनी परिश्रम घेतले.
ग्रामस्थांनी स्नेहसंमेलनातील सहभागी सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक करून त्यांना प्रोत्साहन दिले व पारितोषिक ही दिले.