धाराशिव तालुक्यातील कावलदरा परिसरात चारचाकी वाहने आडवून चालकास मारहाण करुन लोखो रुपये लुटले
तीन गाड्याचे लुटमारीत मोठे नुकसान !
तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी
धाराशिव तालुक्यातील कवलदरा परिसरात पहाटेच्या चार वाजण्याच्या सुमारास चारचाकी वहानांना आडकून चार ते पाच चार चाकी वहानांचे टायर फोडलून ५ ते ७ भामट्यांनी तोंडाला मास्क लावून लुटमार करीत मारहाण करुन आयफोन ,लॅपटॉप ,पैसे, सोने दागीने असे लाखो रुपये लुटल्याची घटना गुरुवार दि.१० पहाटे ४.०० वाजेच्या सुमारास कावलदरा परिसरात घडली.
४ वाजेच्या सुमारास कावलदरा परिसरातील महामार्गावरील पाच ते सात भामट्यांनी रस्त्याच्या साईटला झाडी मध्ये थांबून रस्त्यावर दगड टाकले आणि फॅमिली प्रवास करीत असलेल्या चार ते पाच चारचाकी गाड्या आडवून मारहाण करुन त्यांच्या खिशातील रोख पैसे, सोने, लॉपटॉप, आयफोन असे लाखो रुपये बळजबरीने हिस्कावून घेतले. या लुटमारीच्या घटनेनंतर कुरेशी हे सोलापूर ते धाराशिव प्रवास करीत होते त्या चालकानी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलिस प्रशासन जवळपास आरदा ते एक तासानी पोलिसांनी घटनास्थळ गाठून भामट्यांचा शोध घेतला. मात्र ते मारहार करून लूटमार करून पसार झाले होते. या घटनेमुळे परिसरातील नागरिक भयभीत झाले आहेत.पुढील तपास धाराशिव ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस करीत आहेत.
या लुटमारीत नागरीक फॅमिली यांना जबर मारहाण झालेले आहे हे तुळजापूर उपजिल्हा रुग्णालय येथे उपचार घेत आहेत.पोलीस प्रशासन चोरट्यांचा शोध घेत आहे.