तुळजापुरात भाजपचा वर्धापन दिन उत्साहात साजरा
तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी
तुळजापूर शहरात भारतीय जनता पार्टीच्या 45 व्या वर्धापन दिनानिमित्त आयोध्या नगर आणि विश्वास नगर येथील नागरिकांना आयुष्यमान भारत कार्डचे ऑनलाइन मोफत वाटप करण्यात आले. या शिबिरात एकूण 90 लाभार्थ्यांचे ई केवायसी चेक केले यापैकी एकूण 54 इ केवायसी केल्या आरोग्यमित्र बाबासाहेब भांगे, संतोष दराडे यांनी हा कॅम्प यशस्वीरित्या पार पाडला.
यावेळी भाजप प्रदेश कार्यकारणी सदस्य गुलचंद व्यवहारे, भाजपचे तालुकाध्यक्ष संतोष बोबडे, युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष आनंद कंदले, माजी नगरसेवक अमर हंगरगेकर,भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष संदीप गंगणे, शहर सरचिटणीस धैर्यशील दरेकर, युवा मोर्चाचे शहराध्यक्ष राम चोपदार, नितीन पवार, प्रशांत राठोड, यांच्यासह भाजपचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते