गुंठेवारीच्या बोगस कागदपत्राद्वारे खरेदीखत नोंदणी: तुळजापूर पालीकेची बोगस गुंठेवारी उघड,
नूतन मुख्याधिकारी कारवाई करणार का ?
तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी
तुळजापूर शहरातील सुरज बंडू कानडे यांची सर्वे नंबर २०७ /२ प्लॉट नं.२८ ची तुळजापूर नगरपालिकेतील संबंधित अधिकाऱ्यांनी बोगस गुंठेवारी केले आहे. शहरात जमिनीच्या खरेदी विक्री संदर्भात लागु असलेल्या व आवश्यक असलेल्या गुंठेवारीतच बनावट व बोगस कागदपत्राचा आधार घेत संबंधित अधिकारीच आपल्या अधिकाराचा दुरुपयोग करीत बनावट गुंठेवारीच्या आधारावर खरेदीखत करुन देण्याची वाट मोकळी करून दिली असल्याचा प्रकार तुळजापूर नगरपालिकेत उघडकीस आला आहे तुळजापूर नगरपरिषदेच्या अधिकाऱ्यांच्या वतीने खऱ्या गुंठेवारी प्रमाणपत्रात खाडाखोड करणे, खऱ्या वस्तुस्थितीच्या रेकॉर्डला बाजूला ठेवून आपल्याच मर्जीने बनावट कागदपत्रे तयार करून दुय्यम निबंधकांची दिशाभूल करून देणारे बोगस व बनावट कागदपत्रे तयार करून देत असल्यामुळे बोगस कागदपत्राच्या आधारे खरेदीखताच्या संख्येत वाढ होत आहे.
उपाधीक्षक भूमी अभिलेख कार्यालय तुळजापूर यांना दि.३० /०४ /२०२४ रोजी
संदर्भ क्र.२ व ३ अन्वये आपल्या कार्यालयाकडून तुळजापूर नगर परिषद हद्दीतील सर्वे नं.२०७/२, प्लॉट क्र.२८ चे पोटहिस्सामध्ये असलेल्या वहिवाटीप्रमाणे मोजणी करून मोजणी शीट सादर करावे. मात्र सदरील अभीलेख व मोजणी अर्जाची तपासणी केली असता मौजे तुळजापुर येथील सर्वे न २०७/२ प्लॉट न २८ ची गुठेवारी मोजणी झालेली दिसुन येत नाही तसेच गुठेवारी शासन परीपत्रक जमाबंदी आयुक्त आणी संचालक भुमी अभीलेख पुणे यांचे दि. १६/१२/२००३ चे परीपत्रक अन्वये मोजणी अर्ज या कार्यालयास प्राप्त झालेला दिसुन येत नाही त्यामुळे मोजणी नकाशा पुरवीता येत नाही. असे पत्र नगरपालिकाला उप भूमि अभिलेख कार्यालयाने दिले आहे.
तात्कालीन मुख्याधिकाऱ्यांचा विश्वासाचा फायदा घेऊन संबंधित नगरपालिकेतील अधिकाऱ्यांनी बोगस गुंठेवारीकेलेली समोर आली आहे.
तुळजापूर नगर परिषद तुळजापूर; अधिकाऱ्यांचा प्रताप !
नगर परिषद तुळजापूर येथील नगर रचना सहाय्यक मॅडम यांनी कागदपत्राची शहनिशा न करता चुकीच्या पद्धतीने केलेल्या गुंठेवारीला रद्द करून संबंधित महिला अधिकाऱ्यावर नुतन मुख्याधिकारी अजिक्य रणदिवे हे कारवाई करणार का ?