शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाध्यक्ष सुरज साळुंखे माजी आमदार सुजितसिंह ठाकूर यांचा पुष्पगुच्छ का नाकारला ?
फडणवीसांनी पुष्पगुच्छ का नाकारला;पुष्पगुच्छ नाकारण्याचे कारण काही पुढे आले नाही.
तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी
महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दि. २९ मार्च रोजी तुळजापूरच्या दौऱ्यावर आले होते.तत्पूर्वी मुंबईहून सकाळी साडेदहाला सोलापूरच्या विमानतळावर उतरले नंतर मुख्यमंंत्री फडणवीस हे हेलिकॉप्टरने तुळजापूरला आल्यानंतर तुळजापूर येथील हेलिपॅडवर जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार,जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मैनाक घोष यांनी शाल,श्रीफळ व देवींजींची प्रतिमा देऊन सत्कार केला.
त्या नंतर भाजपाचे माजी आमदार सुजितसिंग ठाकूर,अनिल काळे, जि.प.सदस्य रामदास (आण्णा) कोळगे, शिवसेना शिंदे गटाचे अमोल जाधव, कमलाकर दाणे,शिवसेना शिंदे गटाचे धाराशिव जिल्हाध्यक्ष सुरज साळुंके यांनी मुख्यमंत्र्यांच्या स्वागतासाठी पुष्पगुच्छ पुढे केला. मात्र, यांच्यासोबत मुख्यमंत्र्यांनी भाजपा माजी आमदाराचाही पुष्पगुच्छ स्वीकारण्यास नकार दिला.पुष्पगुच्छ नाकारण्याचे कारण काही पुढे आले नाही.