बार्शी तालुक्यातील आळजापूर येथे क्षुल्लक कारणावरून मारहाण; एका तरुणाचा मृत्यू
उपजिल्हा रुग्णालय तुळजापूर येथे तणावाचे वातावरण !
तुळजापूर : प्रतिनिधी
बार्शी तालुक्यातील आळजापूर येथे क्षुल्लक कारणावरून झालेल्या मारहणीत एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना दि.३१ मार्च रोजी रात्री ७ वाजता घडली. या घटनेमुळे उपजिल्हा रुग्णालय तुळजापूर येथील परिसरात काही काळ तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. या प्रकरणी पोलिस आरोपीला जोपर्यंत ताब्यात घेत नाहीत तोपर्यंत प्रेत ताब्यात घेणार नाही असा पवित्रा मयताच्या नातेवाईकांनी घेत संताप व्यक्त केला.
दि. ३१ मार्च रोजी सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास गावातील
पारावरती आम्ही बसलो होतो त्यावेळी वेशिमधील ग्रामपंचायतीची लाईट चालु असल्याने उजेडात सर्व काही दिसत होते त्यावेळी मयुर अनिल दराडे व नाना गाडेकर असे दोघेजन मिळुन आले होते त्यावेळी संजय अंगद आग्रे यांनी नाना गाडेकर यास हाताने ईशारा करून “चल निघ येथुन” असे म्हणाले असता आरोपी मयुर दराडे याने गैरसमज करून घेवुन त्याने फिर्यादीस लाथाबुक्क्यांने मारहान करण्यास सुरवात केली त्यावेळी फिर्यादीचा भाऊ अमोल अंगद आग्रे वय २७ वर्ष हा त्याठीकाणी येवुन मयुर दराडे यास म्हणाला तु त्यास मारहाण का करतो असे म्हणुन सोडवा सोडवी करीत असतांना मयुर दराडे याने तु कशाला मध्ये आला आता तुला बघतोच असे म्हणुन भावाला जोरात पाराच्या कटड्यावरून ढकलले असता माझा भाऊ अमोल अंगद आग्रे याला डोक्याच्या पाठीमागील भागावर आपटल्याने त्याच्या डोक्यास गंभीर दुखापत होवुन जागेवरच बेशुध्द पडला म्हणुन त्याला लागलीच उचलत असतांना त्याठीकाणी फिर्यादीचा चुलत भाऊ विजय हणुमंत आग्रे हे आले असल्याचे पाहुन मयुर दराडे याने फिर्यादीच्या तोंडावर लाथ मारल्याने फिर्यादीच्या नाका तोंडातुन रक्त येवु लागले त्यामुदतीत फिर्यादीचे नातेवाईक त्याठीकाणी आले व त्यांनी फिर्यादीच्या बेशुध्दा भावास पाहुन आत्याचा नवरा दत्तात्रय देशमुख यांनी चार चाकी गाडीतुन उपचारकरीता उपजिल्हा रुग्णाल तुळजापूर येथे उपचारासाठी दाखल केले असता येथील डॉक्टरांनी तपासुन उपचारापुर्वी मयत झाला असल्याचे सांगितल्या नंतर फिर्यादीला झालेल्या मारहाणीवर उपचारकरीता शासकिय जिल्हा रुग्नालय धाराशिव येथे दाखल केले असुन सध्या मयताच्या भावावर उपचार चालु असुन पुर्णपणे शुध्दीवर आहे.
आरोपी मयुर अनिल दराडे याने गैरसमज करून घेवुन लाथाबुक्क्यांनी मारहाण करीत असताना संजय अंगद आग्रे यांचा भाऊ अमोल आग्रे हा सोडवण्यासाठी आला असता त्यास मयुर दराडे याने जिवे मारण्याच्या उद्देशाने जोरात ढकलुन दिल त्याचे डोकीस गंभीर दुखापत करून जिवे ठार मारले असल्याने मयताचा भाऊ संजय अंगद आग्रे यांच्या फियादीवरून आरोपी मयुर अनिल दराडे याच्या विरूध्द कलम १०३(१),११५(२),३५१(२) वैराग पोलिस ठाणे येथे गुन्हा दाखल. पुढील तपास पोलिस प्रशासन करीत आहे.