परप्रांतीयांचा तीर्थक्षेत्र तुळजापूर येथे शेत जमीन अनधिकृत खरेदीचा सुळसुळाट चवाट्यावर

परप्रांतीयांचा तीर्थक्षेत्र तुळजापूर येथे शेत जमीन अनधिकृत खरेदीचा सुळसुळाट चवाट्यावर

तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी

परप्रांतीयांचा तुळजापूर शहरात शेतजमीन खरेदी करताना शेतकरी असल्याचे प्रमाणपत्र बंधनकारक असताना संबधित अधिकाऱ्यांना अधिक पैशाची लालचदेऊन शेत जमीन प्रमाणपत्र आहे. असे भासवून शासनाची दिशाभूल करून परप्रांतीयानी कोट्यावधी रुपयाच्या तुळजापूर शहरात अनधिकृत जमीन (प्रॉपर्टी ) खरेदी केल्या आहेत.

तुळजापूर शहरात शासनाने दिलेला भूखंड या शासनाच्या जमीनक्षेत्रावर जिल्हाधिकाऱ्यांचा परवाना नसताना संबंधित दलाला मार्फत व तात्कालीन सबरजिस्टर तुळजापूर या अधिकाऱ्यांना परप्रांतीयानी अधिक पैसे देऊन अनाधिकृत कोट्यावधीची प्रॉपर्टी (बंगले )खरेदी केले आहेत. शासनाच्या जागेवरची प्रॉपर्टीवर व भुखंड (बंगल्यावर )जिल्हाधिकाऱ्यांनी परवानगी दिलेली आहे. ती प्रॉपर्टी सोडून ज्या प्रॉपर्टीवर जिल्हाधिकाऱ्यांची खरेदी करण्याचे परवानगी नाही अशा प्रॉपर्टीचे दस्त ( खरेदी रद्द करावी. अशी शहरातील नागरिकातून मागणी केली आहे.

शासनाचा भुखंड व शासनाच्या या क्षेत्रावरील उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालय तुळजापूर येथे अधिकाऱ्यांना चिरीमिरी देऊन मागील काळात फेर देखील घेतलेले आहेत. याचीही चौकशी करून संबंधित तात्कालीन सबरजिस्टर व उपअधीक्षक भूमी अभिलेख, कार्यालय
तुळजापूर या अधिकाऱ्यांवर योग्य ते कारवाई करून शहरातील शासनाचे भुखंड सर्व दस्त रद्द करण्यात यावे.

शासनाच्या नियमांची परप्रांतीयांकडून पायमल्ली

परप्रांतीय तुळजापूर येथे जमिनी घर खुल्या जागा घेताना नियम पाळत नाहीत त्यांना काही संबंधित अधिकारी व दलाल मदतीचा हात देतात आणि आपले उखळ पांढरे करून घेतात. कितीतरी प्रकरणे आसे आहेत की ज्यात ह्या परप्रांतीय लोकानी शासनाचा कर चुकवला आहे आणि शासनाने घालून दिलेल्या नियमांची पायमल्ली केली आहे. तरी शासनाने चौकशी करून कठोर कारवाई करावी.

शासनाची (भुखंड ) जागा खरेदी करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी नाही.

तुळजापूर शहरातील (भुकंड ) या शासनाची जागा खरेदी करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी नाही. असे जेवडे दस्त झालेले आहेत ते सर्व दस्त जिल्हाधिकाऱ्यांनी रद्द करून तात्कालीन सबरजिस्टर व उपअधीक्षक भूमी अभिलेख, कार्यालय तुळजापूर या अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करावे

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट ) तालुका अध्यक्ष श्रीकृष्ण सूर्यवंशी,तुळजापूर

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!