भाजपा युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष कदम यांच्यावर जीवघेणा हल्ला; हल्लेखोरावर पोलिसांनी गुन्ह दाखल करावा – राजेश्वर कदम
तुळजापूर : प्रतिनिधी
तिर्थ क्षेत्र तुळजापूररात मटका, जुगार, अवैद्य धंद्याच्या विरोधात प्रशासनात तक्रार निवेदन दिल्याचा मनात राग धरून विरोधकांनी भारतीय जनता पार्टीचे युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष राजेश्वर कदम यांच्यावर चाकू आणि तलवारीने जीवघेणा हल्ला करण्यात आल्याची घटना दि.१९ मार्च रोजी सायंकाळी तुळजापूर शहरातसमोर आली आहे. तर या प्रकरणी विरोधकांनी खोटा गुन्हा दाखल करण्यासाठी तुळजापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यासाठी विरोधकांनी कट रचला आहे.
तरी पोलिस प्रशासनाने सखोल चौकशी करून चौकशीअंती कदम यांचीजर चुक निदर्शनात आली तर गुन्हा दाखल करा असे पत्रकारांना कदम यांनी बोलताना सांगितले.