तुळजापूर नगर पालिकेतील कंत्राटी अभियंता प्रशांत चव्हाण यांची बेकायदा नियुक्ती रद्द करा..
नियमबाह्य पद्धतीने अदा करण्यात आलेले वेतन वसूल करा डाॅ.अण्णाभाऊ साठे क्रांती सेनेची मागणी…
तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी
तुळजापूर नगर पालिकेतील कंत्राटी अभियंता प्रशांत चव्हाण यांची बेकायदा नियुक्ती रद्द करण्यासह नियमबाह्य पद्धतीने अदा करण्यात आलेले वेतन वसूल करण्याची मागणी डाॅ. अण्णाभाऊ साठे क्रांती सेनेने नगर पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांकडे केली आहे.
अभियंता चव्हाण यांची १५ वर्षापूर्वी तुळजापूर विकास प्राधिकरणा अंतर्गत पालिकेत कंत्राटी तत्वावर नियुक्ती करण्यात आली होती. मात्र विकास प्राधिकरणाचे काम संपल्यानंतर ही अभियंता चव्हाण यांना नियम डावलून वेळोवेळी मुदतवाढ देण्यात आली आहे. विशेष म्हणजे कंत्राटी कर्मचाऱ्यांची सेवा खंडित करणे आवश्यक असताना अभियंता चव्हाण गेल्या १५ वर्षांपासून पालिकेत विनाखंड कार्यरत आहेत. याशिवाय चव्हाण यांना नियमबाह्य पध्दतीने वेतन वाढ दिल्याचे सांगण्यात येत असून चव्हाण यांची नियमबाह्य नियुक्ती रद्द करण्यासह चव्हाण यांचा कार्यकालाची चौकशी करून नियमबाह्य पद्धतीने अदा करण्यात आलेले वेतन वसूल करण्याची मागणी डाॅ. अण्णाभाऊ साठे क्रांती सेनेने पालिकेचा मुख्याधिकाऱ्यांकडे निवेदना द्वारे केली आहे.
चव्हाण यांचावर कारवाईस विलंब झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे. निवेदनावर डाॅ. अण्णाभाऊ साठे क्रांती सेनेचे जिल्हाध्यक्ष किरण कांबळे, हणमंत गवळी, सुनिल मोरे आदिंची स्वाक्षरी आहे.