अजिंक्य रणदिवे यांची तुळजापूर पालीकेला मुख्याधिकारी म्हणून नियुक्ती
तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी
आई तुळजाभवानीचे पवित्र
तीर्थक्षेत्र असलेल्या तुळजापूर नगरपालिकेला अखेर तीन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर पूर्ण वेळ मुख्याधिकारी मिळाला आहे. अजिंक्य रणदिवे यांची मुख्याधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
तीन वर्षांपूर्वी तत्कालीन मुख्याधिकारी अरविंद नातू यांची बदली झाल्यानंतर उपविभागीय अधिकारी यांच्याकडे अतिरिक्त पदभार देण्यात आला होता. त्यामुळे नगरपालिकेच्या अनेक कामांमध्ये विलंब होत होता. सहा महिन्यांपूर्वी नळदुर्ग नगर परिषदेचे मुख्याधिकारी कुंभार यांच्याकडे तुळजापूर पालिकेचा अतिरिक्त पदभार देण्यात आला होता.
अखेर, तीन वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर तुळजापूर नगरपालिकेला पूर्ण वेळ मुख्याधिकारी मिळाल्याने स्थानिक नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. अजिंक्य रणदिवे यांची मुख्याधिकारी म्हणून नियुक्ती झाल्यामुळे नगरपालिकेच्या कामकाजात गतिमानता येईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.