तुळजापूर तालुक्यातील मसाला येथील पेव्हर ब्लॉकचे काम निकृष्ट दर्जाचे;ग्रामपंचायतचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष
साठे नगर आणि भीम नगर भागातील नागरिकांमध्ये तीव्र संतापजनक वातावरण
तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी
तालुक्यातील मसला या गावात अनुसूचित जाती, नवबुद्ध घटनांचा विकास व दलित वस्ती निधी योजनेअंतर्गत गावातील साठे नगर व भीम नगर येथे पेव्हर ब्लॉक बसवण्याचे काम करण्यात आले आहे. पण हे काम निकृष्ट दर्जाचे झाले आहे. पेव्हर ब्लॉक हलके आणि दर्जाहीन वापरण्यात आले आहेत. दर्जाहीन पेव्हर ब्लॉकमुळे अनेक ठिकाणचे ब्लॉकचे कोणे तुटलेले फुटलेले दिसत आहेत.
हे पेव्हर ब्लॉक एक लेव्हल मध्ये व्यवस्थित न बसवल्यामुळे आतुर मधुर काम करून लाखो रुपये ग्रामपंचायत व संबंधित गुत्तेदार यांनी निधी लाटला आहे.अशी चर्चा दलित वस्तीतून केली जात आहे.
संबंधित गुत्तेदाराने स्वतःच्या फायद्यासाठी ग्रामपंचायत सोबत संगणमत करून अशा प्रकारे भोगस काम केले आहे.खालीवर असणाऱ्या पेव्हर ब्लॉकमुळे आणि दोन ब्लॉक मध्ये असणाऱ्या गॅपमुळे पावसाळ्यात या भागात राहणाऱ्या रहिवाशांना त्याचा त्रास जाणवणार आहे. बसवलेल्या दोन पेव्हर ब्लॉक गॅपमध्ये सिमेंट देखील भरले नसल्याचे दिसत आहे.
काही ठिकाणी ब्लॉक न लावता केवळ सिमेंट काँक्रेट वापरले आहे तर काही लोकांच्या खाजगी जागेत देखील पेव्हर ब्लॉक बसवले आहेत. हे काम शासनाच्या वर्कऑर्डर प्रमाणे झाले नसून
सदरील कामाची चौकशी करून दोषी ठेकेदार व ग्रामसेवक आणि सरपंच यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी साठे नगर आणि भीम नगर येथील नागरिकांनी तुळजापूरनामा न्युजशी बोलताना प्रतिक्रीया दिली आहे.