श्री तुळजाभवानी महाद्वार परिसराने अतिक्रमणमुक्त घेतला मोकळाश्वास – सहायक पोलीस निरीक्षक अर्जुन चौधर

श्री तुळजाभवानी महाद्वार परिसराने अतिक्रमणमुक्त घेतला मोकळाश्वास – सहायक पोलीस निरीक्षक अर्जुन चौधर

तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी

तुळजापूर शहरातील मंदिरासमोर विविध साहित्य विक्री करणाऱ्या महिला विक्रेत्या तसेच हातगाडी चालकांसाठी भवानी रोडवर पांढरेपट्टे मारून मार्किंग करण्यात येणार असून शहरातील विक्रेते व्यापारी व नागरिकांच्या आयोजित बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी साडेतीन शक्तीपीठ पैकी एक पूर्ण पीठ असलेली जगतजनेनीच्या दोन्ही महाद्वार परिसरासह संपूर्ण आर्य चौक रोड व भवानी रोड या वरील पूर्ण परिसर अतिक्रमणमुक्त केला आहे.

सहायक पोलीस निरीक्षक अर्जुन चौधर प्रभारी अधिकारी,मंदिर चौकी तुळजापूर यांनी मागील सात दिवसापासून दिवसभर या सर्व परिसरामध्ये गस्त करून बेकायदेशीर महाद्वार परिसरातील अतिक्रमण काढून अतिक्रमण करत असलेल्या महिलांना यापुढे अतिक्रमण करायचे नाही आणि भाविकांना कोणताही त्रास होईल असे क्रत्य करायचे नाही.बेकायदेशीर महाद्वार परिसरातील न बसता भवानी रोड वरती बसावे मंदिर महाद्वार परिसरात बसायचे नाही अशीसत्त ताकीत दिली यामुळे अतिक्रमणमुक्त शहाजीराजे महाद्वार परिसराने घेतला मोकळा श्वास.श्री तुळजाभवानी महाद्वार परिसराने अतिक्रमणमुक्त घेतला मोकळाश्वास !

मुंबईसारख्या ठिकाणीकर्तव्य बजावताना अनेक धडाकेबाज कामगिरीने पोलिस ठाण्याहद्दीतील गुन्हेगारीला चाप बसवताना अनेक गुन्हेगारांनाही जेरीस आणले आहे, त्यांच्या धडाकेबाज कामगिरीमुळे मा.पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य मुंबई यांचा “सर्वात्कृष्ट तपास” पुरस्कार प्राप्त पोलीस स्टेशन ठरले आहे. अशा धडाकेबाज अधिकाऱ्यांची श्री तुळजाभवानी मंदिर पोलीस चौकी येथे धडाकेबाज कामगिरी मुळे शहाजीराजे महाद्वार परिसराने अतिक्रमण मुक्त घेतला मोकळा श्वास तुळजापूर शहरात सहाय्यक पोलीस निरीक्षक अर्जून चौधरी यांचे कौतुक होत आहे..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!