बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच कै. संतोष देशमुख हत्येच्या निषेधार्थ तुळजापूर शहर कडकडीत बंद; तहसिलदारांना निवेदन
तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी
बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच कै. संतोष (आण्णा) देशमुख यांच्या निर्घृण हत्येच्या निषेधार्थ धाराशिव जिल्हा एकदिवसीय कडकडीत बंद पाळण्यात आला.
या बंदमध्ये तुळजापूर शहरासह तालुक्यात देखील आस्थापणे बंद ठेवत सहभाग नोंदवला . या हत्याकांडातील मुख्य आरोपी अद्याप फरार असून, त्याला तातडीने अटक करण्याची मागणी जोर धरत आहे. तसेच या प्रकरणात धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेऊन त्यांना सहआरोपी करण्याची आणि मुख्य आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी जनतेकडून होत आहे.गुन्हेगारांवर कठोर कारवाईची मागणी, जलदगती न्यायालयात खटला चालविण्याची मागणी या घटनेतील आरोपींना तातडीने कठोर शिक्षा देण्यासाठी जलदगती न्यायालयात खटला चालवण्याची मागणी होत आहे. राज्यातील गुंड प्रवृत्तीच्या राजकारण्यांवर आणि त्यांच्या समर्थकांवर अंकुश घालण्यासाठी आणि अशा नराधमांना फाशीची शिक्षा देण्यासाठी कडक पावले उचलण्याची गरज असल्याचे सामाजिक कार्यकर्ते आणि विविध संघटनांकडून सांगण्यात येत आहे.शांतता व सुव्यवस्था कायम राखण्यासाठी कडक उपाययोजनांची मागणी या पार्श्वभूमीवर प्रशासनाने तातडीने कठोर कारवाई करावी आणि महाराष्ट्रातील शांतता व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात, अशी सर्वसामान्य जनतेची मागणी आहे. तसेच, गुन्हेगारांना कठोर शिक्षा न झाल्यास यापुढे आणखी तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारदेत आंदोलकांनी तुळजापूर तहसिलदार यांना निवेदन दिले आहे.