केंद्र शासनाच्या योजनेच्या कामात बंधारा बांधणेम्हणे गुत्तेदार व आधिकाऱ्यांचे झोळी भरणे ?
अधिकाऱ्यशी गुत्तेदारांनी संगणमत करून शासनाची लाखो रुपयाची लूट कण्याचा घाट !
तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी
लातूर रोड तुळजापूर शहराजवळ तडवळा बायपास येथे रेल्वेसाठी संपादन झालेल्या जमिनीत बंधारा बांधणेम्हणे अधिकाऱ्याला संगनमत करून गुत्तेदाराच्या व आधिकाराच्या आर्थिक फायद्या साठी केंद्र शासनाच्या भुसंपादन झालेल्या जमिनीत पुन्हा बंधारा बांधण्याचा घाट.ओढ्याच्या ठिकाणी काँक्रिटचा बंधारा बांधून शासनाची लाखो रुपयाची लूट
शासनाने नियोजन शुन्य नियोजनाअभावी बांधण्यात येत आसलेला हा बंधारा बांधण्यापासूनच वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. हा बंधारा बांधण्याची जागा चुकली असली तरी गुत्तेदार व संबंधित अधिकाऱ्याचा घाट मात्र कायम आहे.
बंधारा बांधल्यानंतर त्याठिकाणी रेल्वेसाठी धाराशिव तालुक्यातुन खामसवाडी, बावी , मोर्ड परिसरातून रेल्वेचेकाम चालून आहे आणि मागे रेल्वेचे काम जलत गतीने चालू असताना पुढे त्याच मार्गावर लातूर रोड तुळजापूर बायपास येथे बंधारा बांधून लाखो रुपये बिल काढण्याच्या नादात गुत्तेदार आधिकारी गुंग
बंधारा बांधून दुष्काळात तेरावा महिना म्हणतात तशी अवस्था तालुक्यात येत्या काही दिवसांत जाणवणार आहे. मात्र, प्रशासन ढिम्म असल्याने या भुसंपादन झालेल्या जमिनीवर परत जलसंधारण विभागाकडून बंधारा बांधून शासनाची दिशाभुल करून लाखो रुपये लाटण्याचा घाट चालू आहे मात्र जलसंधारण विभागाच्या कोणाचेच लक्ष दिसत नाही.
एकीकडे जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत शासन पाण्यासाठी प्रचंड खर्च करत असताना, प्रशासनाचे कोणत्याही प्रकारचे लक्ष नसल्याने हा बंधारा फक्त नावालाच राहणार आहे.
प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे शासनाच्या जलयुक्त शिवारसारख्या योजना या कागदावरच गिरवीण्याचे काम करीत आहेत.की, काय हा प्रश्न निर्माण होत आहेत. किंबहुना अशा योजनांवर जाणीवपूर्वक लक्ष दिले जात नसून, त्यामागे एक मोठी लॉबी काम करत आहे की काय असा प्रशन निर्माण झाला आहे.
बंधाऱ्याचा संपूर्ण भाग पाण्याच्या प्रवाहाबरोवर केंद्र शासनाच्या योजनेच्या कामात वाहून जाणार हे मात्र नक्कीच ह्यात शासनाची दिशाभूल करून गुत्तेदार व अधिकारी मात्र होणार मालामाल हे नक्कीच…