कमानवेस पूर्व मंगळवार पेठ भागातील यात्रा मैदान पुजारी महीलांचे आमरण उपोषण !
जिल्हाधिकाऱ्यांच्याशब्दावर यात्रा मैदान उपोषण त्वरित स्थगित.
तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी
तुळजापूर नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष सचिन रोचकरी तसेच माजी नगरसेवक सौ.आरती रणजित इंगळे, सौ.सुचिता आनंद (मालक) जगताप , भाऊ भांजी या माजी नगर अध्यक्षासह नगरसेवकाने पाठींबा दिला.
यात्रा मैदान हे सन साल १९९८ साली नगर परिषद तुळजापूरने गट नं १३८,१३९ हि जागा यात्रा मैदानासाठी आरक्षित केले होते परंतु आज पर्यंत नगर परिषदने त्या ठिकिणी यात्रा मैदान केलेले नाही. काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष ॲड धीरज पाटील, श्री तुळजाभवानी पुजारी मंडळानी ही पाठिंबा दिला आहे.यावेळी शहरातील असंख्य महिला उपोषणस्थळी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या नुतन
जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांनी दोन-चार दिवसात योग्य तो तपास करून निकाली काढू म्हटल्यामुळे महिलांनी आमरण उपोषण त्वरित स्थगिती दिली.
यावेळी नायब तहसिलदार पेरे मॅडम ,मंडळ अधिकारी अमर गांधले,बालाजी चामे यांनी लिंबू सरबत पाजून उपोषण सोडले
सदरील उपषोण ठिकाणी माजी नगरसेवक अंबरीष (भैया) जाधव,मा.नगरसेवक अभिजीत कदम, शिवसेना नेते अमोल जाधव, नेपते, किरण यादव,पुजारी नानासाहेब डोंगरे,काकासाहेब चिवचिवे,गणेश कदम,राजेश्वर कदम , विक्रम कदम आदी पुजारी बांधव उपस्थित होते.