देविभक्तांच्या सोईसाठी यात्रा मैदान हवेच, असंख्यलाडक्या बहिणींचे तहसिलदारांना निवेदन
महिलांचे तहसिल कार्यालयासमोर आमरण उपोषण !
तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी
धाराशिव रोडलगत तुळजापूर शहरात मैदानासाठी आरक्षित सात एकर जागा. असून १९८९ साली शासनाने ही जागा यात्रा मैदानासाठी राखीव ठेवली होती. काही पुढाऱ्यांनी सत्तेच्या खुर्चीवर बसताच ठराव बदलला, फेरफार गायब झाले आणि डुप्लिकेट पीआर कार्ड तयार करून यात्रा मैदानात काही प्लॉट विक्री केली आहे. अशा पुढऱ्यावर कठोर कारावाई करावी असे अरारोप करीत शहरातल्या महिलांनी दि.३मार्च रोजी तळजापूर तहसिलदारांना निवेदन देवून आमरण उपोषणास केली सुरुवात.
निवेदनात असे नमूद केले आहे की,यात्रा मैदानच्या जमिनीवर महाराष्ट्र शासन नाव लागत नाही तो पर्यंत उपोषण सुरूच राहणार.
निवेदन देताना शहरातील असंख्य महिला मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या तुळजापूर तहसील कार्यालय समोर शहरातील महिलांचे आमरण उपोषण.