पदभार स्वीकारल्यानंतर नूतन जिल्हाधिकाऱ्यांनी घेतले श्री तुळजाभवानी मातेचे दर्शन
तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी
धाराशिव जिल्ह्याचे नवनियुक्त
जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांनी काल (दि. २६) रात्री उशिरा श्री तुळजाभवानी देवीचे दर्शन घेतले. जिल्हाधिकारी म्हणून नियुक्तीनंतर त्यांचा हा पहिलाच तुळजापूर दौरा होता.
राज्य सरकारने डॉ. सचिन ओंबासे यांची सोलापूर महानगरपालिकेच्या आयुक्तपदी नियुक्ती केल्यानंतर त्यांच्या जागी किर्ती किरण पुजार यांची धाराशिव जिल्हाधिकारी म्हणून नेमणूक केली आहे. यापूर्वी ते रत्नागिरी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत होते.
श्री तुळजाभवानी देवीचे दर्शन घेतल्यानंतर मंदिर संस्थानच्या वतीने तहसीलदार अरविंद बोळंगे यांनी त्यांचा सत्कार केला. यावेळी सहायक व्यवस्थापक (धार्मिक) अमोल भोसले, सहायक व्यवस्थापक (विद्युत) अनिल चव्हाण, भंडारपाल नागेश शितोळे, जनसंपर्क अधिकारी गणेश निर्वळ, प्रशांत जाधव, गणेश मोटे, सुरक्षा निरीक्षक विक्रम कदम, नवनाथ खिंडकर, स्वच्छता निरीक्षक अक्षय साळुंखे यांच्यासह मंदिर संस्थानचे कर्मचारी उपस्थित होते.
नवीन जिल्हाधिकारी म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर किर्ती किरण पुजार यांचे प्रथम दर्शन असल्याने तुळजाभवानी मातेच्या कृपेने जिल्ह्याच्या प्रशासनात सक्षम कामगिरी करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केल्याचे सूत्रांनी सांगितले.