बेकायदा गौण खनिज प्रकरणात भ्रष्टाचाराचा वास;स्वतः तहसीलदारांनी लक्ष घालण्याची गरज – श्रीकृष्ण सूर्यवंशी
तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी
तुळजापूर-लातूर महामार्गा व पवन चक्कीच्या नावाखाली तुळजापूर तालुक्यातील वडगाव लाख परिसरातील लाखो ब्रास गौण खनिजांची, वनसंपदेची मोठ्या प्रमाणात लयलूट होत असल्याच्या स्थानिकांच्या तक्रारी. त्यामुळे या महामार्गाचे तसेच पवन चक्कीचे काम सुरू झाल्यापासून या कामासाठी या भागातील किती गौण खनिज यांचे उत्खनन झाले, महसूल विभागातील संबंधितांनी शासकीय तिजोरीत त्याची रॉयल्टी भरण्याच्या नावाखाली तुळजापूर महसूल प्रशासनातील गौण खनिज विभागातील अधिकाऱ्यांनी स्वःताची तिजोरी भरल्याचा वास परिसरात येत आहे., उत्खनन कायदेशीर की बेकायदेशीर, रिन्यू पावर पवन चक्कीसाठी लागणारा गौण खनिज २०२२ ते २०२५ पर्यंत महामार्गासाठी व पवन चक्कीसाठी म्हणून बेकायदा गौण खनिज उत्खनन करण्यात आलेले आहे.या बाबींची संबंधित तहसिलदार अरविंद बोळंगे यांनी चौकशी करून ठेकेदारावर व अधिकाऱ्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे (अजित पवार) गटाचे श्रीकृष्ण सुर्यवंशी यांनी केली आहे.
या महामार्गासाठी व तुळजापूर तालुक्यात मोठ्या प्रमाणात रिन्यू पावर पवनचक्कीच्या पाईंटवर जाण्यासाठी लागणाऱ्यारस्ता बनवण्यासाठी संबंधित ठेकेदाराने याच खनीमधून गौण खनिज लाखो ब्रास गौण खनिज उत्खनन करण्यात आलेले आहे.
ठेकेदाराने महसूल प्रशासना सोबत संगणमत करून रिन्यु पावर पवनच्चकी व तुळजापूर – लातूर महामागाच्याकामासाठी वडगाव लाख नजीकच असलेल्या एका खाणीमधून गौण खनिज पुरवठा केला होतो; पण संबंधित गौण खनिज पुरवठादाराकडे याबाबतचा परवानाच नसल्याची बाब पुढे आली आहे.त्यामुळे या भागातील महामार्गाच्या व पवन चकीच्या कामाचे गुणनियंत्रण यंत्रणेमार्फत परीक्षण करावे अशी मागणी स्थानिकातून होत आहे.
पवनचक्की साठी वेकायदा गौण खनिज उत्खनन !
तुळजापूर तालुक्यातील तिर्थ परिसरातील पवन चक्कीच्या पाच पाईंटच्या रस्त्यासाठी गौण खनिज उत्खनन बाबत गौण खनिज विभागातील बालाजी चामे यांच्या कडे रितसर मागणी करून आज तागायत दोन महिने होत आहेत मात्र त्यांनी उडवा उडवीची उत्तरे देत पानावर पान टाकत माहिती दिलेली नाही.