भुरट्या चोरट्यांना बसणार
”सायरण आवाजाचा” चाप – नगरसेवक सुनिल रोचकरी
तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी
तुळजापूर शहर काही महिन्या पासून चोरट्यापासून कायम संकट,चोरट्यांचा उपद्रव वाढल्यामुळे प्रभाग क्र. ४ मध्ये सावधगिरी म्हणून नगरसेवक सुनील रोचकरी यांनी ”सायरण आवाजामुळे” सावधगिरी व चोरट्याला ताप बसवण्यासाठी सायरण बसविण्यात आले आहेत.भुरट्या चोरट्यापासून मुक्ती व्हावी म्हणून सौर उर्जा वापरून ‘सौर ऊर्जा कुंपण’ व ‘ध्वनी लहरी विस्करण’ असे यंत्राचे नाव आहे यातील ध्वनी कंपनामुळे भुरटे चोर घराशेजारी फिरकणार नाही, असे नगरसेवक सुनील रोजकरी यांनी सांगितले.
प्रभाग क्रमांक ४ मध्ये वाढत्या चोरीच्या घटनेला आळा घालण्यासाठी माजी नगरसेवक सुनील रोचकरी यांच्या संकल्पनेतून बुधवार दिनांक २६ रोजी पुर्ण प्रभागामध्ये सायरन बसवण्यात आले आहेत.
रात्री बेरात्री संशयीत लोक दिसल्यास हे सायरन वाजवले जाईल. सायरन वाजल्यानंतर प्रभागातील सर्वांनी सावध झाले पाहिजे आणि इतराना पण सावध केल पाहिजे
लवकरच संपूर्ण प्रभागात CCTV कॅमेरे बसवण्यात येणार आहेत
काही संशयित व्यक्ती दिसल्यास सायरन वाजविण्यात येईल.