श्री मुद्गुलेश्वर युवा प्रतिष्ठान तुळजापूरच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन
तुळजापूर : प्रतिनिधी
महाशिवरात्रीनिमित्त शहरातील शिवमंदिरांनमध्ये पहाटे पासुन महादेव मंदीरात दर्शनासाठी भक्तांनी गर्दी केली होती,तसेच शंभुमहादेव मंदीरात धार्मिक विधी मनोभावे केले ,श्रीतुळजाभवानी मंदीरातील भवानी शंकर महादेव मंदीरात दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती श्रीतुळजाभवानी मातेचा कपाळी महादेव पिंड काढण्यात आली होती
तिर्थक्षेञ तुळजापूर पंचक्रोषीत असणाऱ्या श्री भवानी शंकर श्री काशी विश्वेश्वर पापनाश परिसरातील शंभु महादेव तसेच बारालिंगेश्वर रामदरा तलावातील महादेव मंदीरात शंभूमहादेव भक्तांनी गर्दी केली होती.
श्री मुद्गुलेश्वर युवा प्रतिष्ठान तुळजापूरच्यावतीने महाप्रसादाचे आयोजन
श्री मुद्गुलेश्वर महादेव सेवा समिती तथा मुद्गुलेश्वर युवा प्रतिष्ठान तुळजापूरच्या वतीने श्री मुद्गुलेश्वर मंदिरात महाशिवरात्री निमित्त महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते त्याचा मध्ये 1008 किलोची साबुदाणा खिचडी, खरबूज 11000, राजगिरा लाडू 11000 तसेच दूध खिर भक्तांसाठी पिण्याच्या पाण्याची वेवस्ता करण्यात आली होती. या मध्ये हजारो शिव भक्तांनी याचा लाभ घेतला
श्री मुद्गुलेश्वर मंदिर सिंदफळ येथे महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. प्रसादामध्ये साबुदाणा, राजगिरा लाडू, केळी वाटप करण्यात आले. या प्रसादाचा हजारो भाविकांनी लाभ घेतला. कार्यक्रमाप्रसंगी संस्थेचे सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.