शिवभक्तांना महाशिवरात्री निमित्त जिजामाता नगर परिसरातील कुटुंबांना फळे,खिचडी,फराळ वाटप – विनोद गंगणे
तुळजापूर : प्रतिनिधी
महाशिवरात्री निमीत्त
युवा नेते विनोद गंगणे यांच्या वतीने जिजामाता नगर परिसरातील कुटुंबांना व नागरिकांना फळे आणि फराळ साहित्य वाटप करण्यात आले.
विनोद गंगणे हे नेहमीच सामाजिक उपक्रम राबवित असतात, दिवाळी निमित्त हजारो कुटुंबाला दिवाळी फराळ साहित्य वाटप करतात तसेच संपूर्ण रमजान महिन्यात मुस्लिम बांधवाना रोजा सोडण्यासाठी विविध पदार्थ फळे वाटतात, जनतेच्या सुख दुःखात सहभागी होणारा नेता अशी त्यांची ओळख आहे.
दि.२६ फेब्रुवारी रोजी महाशिवरात्री निमित्त ही शेकडो नागरिकांना साबुदाणा, भगर, फळे खरबूज, कलिंगड तसेच रताळे असे फराळचे साहित्य वाटप केले, या वेळी मा नगरध्यक्ष सचिन रोचकरी, आनंद दादा कंदले, विशाल छत्रे, लखन पेंदे, शहराध्यक्ष शांताराम पेंदे, संतोष इंगळे व सहकारी आदि उपस्थित होते.