बाजार समितीचे माजी सभापती विजय गंगणे व मित्रपरिवारातर्फे आमदार राणाजगजितसिंह पाटील प्रिमीअर लिग क्रिकेट स्पर्धेस प्रारंभ !

बाजार समितीचे माजी सभापती विजय गंगणे व मित्रपरिवारातर्फे

आमदार राणाजगजितसिंह पाटील प्रिमीअर लिग क्रिकेट स्पर्धेस प्रारंभ !

तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळ

धाराशिव लोकसभा मतदारसंघातील खेळाडूंसाठी बाजार समितीचे माजी सभापती विजय गंगणे व मित्रपरिवाराच्या वतीने आ. राणाजगजीतसिंह पाटील प्रीमियर लीग ‘डे-नाईट’ (डीपीएल) क्रिकेट स्पर्धा प्रकाशझोतात हडको मैदान येथे घेण्यात येत असून  मंगळवार दि. २५ फेब्रुवारी रोजी रात्री या स्पर्धेचे उदघाटन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले आहे.

या स्पर्धेच्या आयोजित उदघाटन सोहळ्याला युवा नेते विनोद गंगणे, माजी नगराध्यक्ष सचिन रोचकरी, माजी नगरसेवक पंडित जगदाळे,मजूर फेडरेशन चे चेअरमन नारायण नन्नवरे,सचिन पाटील,संतोष बोबडे,बाजार समिती चे माजी सभापती विजयसर गंगणे,विजय कंदले, औदुंबर कदम, विशाल रोचकरी,रामचंद्र रोचकरी, निलेश रोचकरी,बाजार समिती सभापती अँड अशीष सोनटक्के,सुहास गायकवाड, भाजपा युवा मोर्चा तालुकाध्यक्ष आनंद कंदले,मनोज गवळी, विशाल छत्रे,शिवाजी बोधले, रत्नदीप भोसले, संतोष कदम, दिनेश क्षीरसागर, शांताराम पेंदे सह आदी उपस्थित होते.

या क्रिकेट स्पर्धेतील धाराशिव लोकसभा मतदारसंघ मर्यादित गटातील प्रथम बक्षीस २ लाख ५० हजार रुपये, द्वितीय बक्षीस  १ लाख ५० रुपये, तृतीय बक्षीस ८१ हजार रुपये, चतुर्थ बक्षीस ८१ हजार रुपये देण्यात येणार आहे.

तर तुळजापूर विधानसभा मतदारसंघ गटातून  प्रथम बक्षीस ८१ हजार रुपये, द्वितीय बक्षीस ५१ हजार रुपये, तृतीय क्रमांक ३१ हजार रुपये, चतुर्थ क्रमांक २५ हजार रुपये देण्यात येणार आहे.तसेच सामने पहाण्यासाठी येणाऱ्या प्रेक्षकांनाही लकी ड्रॉ पद्धतीने फ्रिज, टी व्ही,वॉशिंग मशीन, कुलर,वॉटर फिल्टर असे आकर्षक बक्षिसे देण्यात येणार आहेत असे बाजार समितीचे माजी सभापती विजयसर गंगणे हे तुळजापूरनामा न्युज शी बोलताना सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!