तलाठी कार्यालये आप आपल्या सज्जा ठिकाणी थाटावीतअन्यथा तोंडाला काळे फासून आंदोलन छडण्यात येईल – शिवसेना नेते अमोल जाधव
तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी
तुळजापूर तालुक्यातील १०८ ग्रामपंच्यात हद्दीतील बहुतांश तलाठी कार्यालय हे भाड्याच्या इमारतीत आहेत. याकडे मात्र प्रशासनाचे दुर्लक्ष असल्याचे दिसून येते.तलाठी कार्यालय भाड्याच्या इमरतीत भाडे महसूल देते का ? मग शेतकऱ्याची आर्थिक लूट करून भाडे भरले जाते ? कोतवाल गायब कोतवाला नोटीस घेवून सज्जा ठिकाणी उपस्थित राहावे आणि तलाठी कार्यालयवण आपआपल्या सज्जा ठिकाणी थारावी असे शिवसेनेचे नेते अमोल जाधव यांनी दि.२७ जानेवारी रोजी शहरातील प्रत्येक तलाठी कार्यालयात जावून तंबी दिली.अन्यथा तोंडाला काळे फासून आंदोलन छडण्यात येईल असा इशारा दिला आहे.शासनाने कोट्यावधी रुपये खर्च करून तालुक्यातील ग्रामीण भागात तलाठी कार्यालय बांधल्या आहेत.महसूल प्रशासनाच्या दुर्लक्षानामुळे इमारतीचा उकरडा झाला आहे.शासनानी कोट्यावधी खर्च करून तलाठी कार्यालय भाड्याच्या इमारतीत का ? भाडे कोण देते महसूल प्रशासन का शेतकऱ्यांकडून आर्थिक लूट करून का ? ग्रामीण भागातील शेतकऱ्यांकडून प्रश्न उपस्थित होत आहे.शासनाला लाखो रुपयांचा महसूल गोळा करून देणारे कार्यालय म्हणून तलाठी कार्यालय मोलाची मदत करीत असते. मात्र याच तलाठी कार्यालयांची दैनावस्था झालेली आहे. बहुतांश तलाठी कार्यालये हे भाड्याच्या इमरतीत थाटली आहेत. शासन अनेक योजना राबवते.त्यामध्ये घरकूल योजना, इंदिरा आवास योजना यासह अनेक प्रकारच्या योजना राबवून अनेक बेघरांना व गरजू व्यक्तींना राहण्यासाठी घर उपलब्ध करून देते. तलाठी कार्यालय हे शेतकर्यांया मदतीचे एक मुख्य केंद्र आहे.या कार्यालयाद्वारे शेतकर्यांना सातबारा, गाव नमुना आठ, उत्पन्नाचे दाखले, जमिनीचे मोजमाप तसेच दुष्काळ, अतवृष्टीने बाधित झालेल्या शेताची, घरांची नोंद घेऊन त्यांचे नुकसान शासनापर्यंंत पोहोचविण्याचा प्रथम कर्तव्य हे तलाठीच करतात. असे एक ना अनेक कामे हे तलाठी कार्यालयामार्फत केले जातात.मात्र त्या मानाने या कार्यालयामध्ये सोयी सुविधांचा अभाव दिसून येतो. शासनातर्फे या कार्यालयाचा कधी विचारच केला जात नाही. शासनाजवळ प्रत्येक गावात स्वत:चे कोठ्यावधी खर्च करून तलाठी कारल्याच्या इमारती बांधलेल्या आहेत मात्र त्या ठिकाणी सज्जावर तलाठी न राहता शहराच्या ठिकाणी भाड्याच्या इमारतीमध्ये आपले दुकान थाटलेले आहे.या कार्यालयातर्फे कितीतरी महसूल गोळा केल जातो. तरी या तलाठी कार्यालयाच्या इमरती धुळखात का ? कदाचित हे कार्यालय सर्वाधिक शेतकर्यांशी निगडित असल्यानेच याची अशी स्थिती असावी.