महसुलची दबक्या पावलांनी ‘वरकमाई’ ; जनतेला तोंड दाबून बुक्क्यांचा मार तर तलाठी, सर्कल आणि कोतवाल मालामाल!

महसुलची दबक्या पावलांनी ‘वरकमाई’ ; जनतेला तोंड दाबून बुक्क्यांचा मार तर तलाठी, सर्कल आणि कोतवाल मालामाल!

ईटकळ येथील शेतकऱ्यांची २० किलोमीटरची फरपट कायम !

तुळजापूर : प्रतिनिधी

तुळजापूर तालुक्यातील तलाठी कार्यालयातील कोतवाल गायब तहसील कार्यालयात कर्मचाऱ्यांची कमतरता असल्याने कोतवाल तहसील कार्यालयात वावरताना दिसतात कोणाच्या आदेशावरून ?

चिरीमिरीची अंगवळणी पडलेली सवई आणि मिळेल तिथं डल्ला मारायची वृत्ती अंगिकारलेली सरकारी बाबूंची हेराफेरी नागरिकांना तोंड दाबून बुक्क्यांचा मार देत आहे. तुळजापूर तहसीलदार कार्यालयाच्या अखत्यारीत असणाऱ्या महसुली मंडळात दबक्या पावलांनी चाललेली वरकमाई नागरिकांच्यात चर्चेचा विषय ठरला आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या कडक स्वभाव चिरीमिरी साठी बोकाळलेल्या तथाकथित रावसाहेब आण्णासाहेबांना अडचणींचा ठरत आहे.यामुळे प्रशासकीय इमारतीतील वरच्या मजल्यापेक्षा खालच्या मजल्यावर वर्दळ पिंगा घालू लागली आहे.’मी नाही त्यातली’अशी बरीच मंडळी आडपडद्याने आपल्या भातावर डाळ ओढण्यात मग्न असल्याची नागरिकांची तक्रार आहे.

महामार्गाचे ठेकेदार नको त्यांच्या मागे पुढे करत असल्याने तुळजापूर महसुलची दिशा नक्की कोणत्या मार्गाने जाते हे स्पष्ट होत आहे.

तहसील कार्यालयात वावर असणाऱ्या व्यक्तीने एका भल्या मोठ्या रकमेची ‘तोड’ केल्याची चर्चा असून ‘तो’व्यक्ती तुळजापूर महसूल मधील नक्की कोणाच्या जवळचा याबाबत उलटसुलट चर्चा आहेत.तालुक्यातील अनेक महसुली मंडळातील मंडळाधिकरी व गावकामगार तलाठी मनमानी कारभार करीत असल्याबाबत नागरिकांच्या तक्रारी आहेत चिरीमिरी दिल्याशिवाय काम होत नसून नाहक त्रास देण्याचा उद्देशाने कामकाज राबविले जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!