राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक धाराशिवचे जिल्हयाचे पालकमंत्री यांच्या प्रमुख उपस्थितीत अमोल जाधव यांचा शिवसेनेत जाहिर प्रवेश
धाराशिव जिल्ह्यातून पालकमंत्री यांच्या हस्ते पहिला प्रवेश !
तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी
महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी साडेतीन शक्तीपीठ पैकी एक पूर्ण शक्तिपीठ मानली जाणारी आई तुळजाभवानी मातेची प्रतिमा व देवीच्या पायाला लावलेली अंबुके कवड्याची माळ कुंकू देवून राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची धाराशिवचे पालकमंत्री पदी निवड झाल्याबद्दल श्री तुळजाभवानी मातेचे पुजारी अमोल शिवाजीराव जाधव यांनी सत्कार केला.
शिवसेना उपनेते माजी आमदार ज्ञानराज चौगुले,धाराशिव जिल्हाप्रमुख मोहन पनोरे यांच्या नेतृत्वावर विश्वास आणि एका शब्दावर मुंबई – ठाणे येथील शिवसेना कार्यालयात राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक धाराशिवचे नुतन पालकमंत्री यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेना (उद्धव ठाकरे गट ) अमोल शिवाजीराव जाधव यांनी दि.२० जानेवारी रोजी धाराशिव जिल्ह्यातून प्रथम शिवसेना (शिंदे गटात ) प्रवेश करीत भगवा झेंडा हाती घेतला.यावेळी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या पक्षप्रवेशामुळे धाराशिव जिल्ह्यात शिवसेनेची ताकत आता आणखी वाढली आहे.शिवसेना (ठाकरे) पक्षांमध्ये वरिष्ठांकडून होत असलेली घुसमट, वरिष्ठांकडून माझ्या कामाकडे होणारे दुर्लक्ष यामुळे पक्षाला सोडचिठ्ठी देऊन आगामी नगरपालिका, जिल्हापरिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात आणि केंद्रात सत्ताधारी असलेल्या महायुती पक्षाची वाट या अमोल शिवाजीराव जाधव यांनी वाट धरल्याचे बोलले जात आहे. जाधव यांच्या पक्ष प्रवेशांमुळे शहरात व तालुक्यात शिवसेनेची ताकद वाढणार असल्याची धाराशिव जिल्ह्यात चर्चा चालू आहे.